शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

‘ई-टेंडरिंग’मुळे जि.प.ची १३ लाखांची झाली बचत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 1:11 AM

विशिष्ट प्रकारच्या स्टिलच्या खाटा खरेदी करण्यासाठी आलेल्या  निधीचा योग्य पद्धतीने विनियोग करीत जिल्हा परिषदेने तब्बल १३ लाख ३५ कोटी रु पयांची बचत केली आहे. रेट कॉन्ट्रक्टनुसार २५ हजारांना पडणारा प्रसूति टेबल ई- टेंडरिंगमुळे अवघ्या १८ हजार रुपयांना पडल्यामुळे ही बचत झाली आहे.

ठळक मुद्दे२२४ खाटा आणि ७६ प्रसूति टेबलची केली खरेदीयोजनेबाबत ‘यशदा’ने केली सूचना!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : माता-बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्राची मातृवंदना योजना राज्यात लागू  करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला असतानाच बुलडाणा जिल्ह्यातील  आरोग्य निर्देशांक कमी असलेल्या सात तालुक्यांत महिलांच्या प्रसूतिदरम्यान अडचणी  येऊ नयेत, यासाठी विशिष्ट प्रकारच्या स्टिलच्या खाटा खरेदी करण्यासाठी आलेल्या  निधीचा योग्य पद्धतीने विनियोग करीत जिल्हा परिषदेने तब्बल १३ लाख ३५ कोटी रु पयांची बचत केली आहे. रेट कॉन्ट्रक्टनुसार २५ हजारांना पडणारा प्रसूति टेबल ई- टेंडरिंगमुळे अवघ्या १८ हजार रुपयांना पडल्यामुळे ही बचत झाली आहे.सप्टेंबर महिन्याचा जिल्हय़ाचा मानव विकास कार्यक्रमाच्या अहवालामधून ही बाब समोर  आली आहे. साधारणत: एक महिना उशिराने हे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त  होत असतात. सातही तालुक्यातील २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रती केंद्र आठ याप्रमाणे  २२४ स्टिलच्या खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, तर २४ आरोग्य केंद्रांना प्र ती एक प्रमाणे २४ टेबल खरेदी करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात मानव विकास  कार्यक्रमांतर्गत चिखली, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, संग्रामपूर  तालुक्यातील आरोग्य केंद्रांसाठी ही खरेदी करण्यात आली. यासाठी मानव विकास  कार्यक्रमांतर्गत ६२ लाख सहा हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. 

योजनेबाबत ‘यशदा’ने केली सूचना!प्रथम जळगाव खान्देशमध्ये या स्वरुपाची खरेदी करण्यात आली होती. त्याची  परिणामकारकता पाहता पुणे येथील यशदा संस्थेने अन्य जिल्ह्यातही ही योजना  राबविण्याची सूचना केली होती. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यात या योजनेंतर्गत ही खरेदी  करण्यात आली.

रेट कॉन्ट्रॅक्ट टाळलारेट कॉन्ट्रॅक्टनुसार प्रती टेबल आणि खाटेला २५ हजार रुपये खर्च येत होता; मात्र ई- टेंडरिंग केल्याने १८ हजार रुपये प्रती खाट पडल्याने १३ लाख ३५ हजार रुपयांची बचत  झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. पी. पवार यांनी दिली. मानव  विकास कार्यक्रमाचे आयुक्त भास्कर मुंडे यांनीही रेट कॉन्ट्रॅक्ट ऐवजी ई-निविदा  मागविण्याबाबत हिरवी झेंडी दिली होती, असेही ते म्हणाले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदhospitalहॉस्पिटल