शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

गोदामाअभावी कृषी साहित्याची धूळधाण

By admin | Updated: December 20, 2014 00:12 IST

लोणार येथील प्रकार; कृषी विभागाचे दुर्लक्ष.

लोणार (बुलडाणा) : पारंपरिक शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देऊन अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी कृषी विभागाकडून अनुदान स्वरूपात विविध कृषी साहित्यांचे वाटप करण्यात येते; परंतु तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी आलेले हे कृषी साहित्य ठेवण्याकरिता तालुका कृषी कार्यालयाच्या मालकीचे गोदामच उपलब्ध नसल्याने कृषी साहित्याची दाणादाण होत आहे. कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे शासनाचे हे कृषी साहित्य धूळ खात पडलेले आहे. शेतकर्‍यांना शेती करताना पारंपरिक अवजारांच्या जागी आधुनिक विकसित साहित्य लोकवर्गणी भरून वाटप करण्यात येते. त्यामध्ये पेरणी यंत्र, मोटार, पंपसेट, पॉवर स्प्रे, नॅपसेट, लोखंडी नांगर, बी-बियाणे, औषधे, स्प्रिंक्लर सेट, पाईप यासह इतर काही कृषी साहित्य विविध योजनेंतर्गत बाजारभावापेक्षा कमी दरात शेतकर्‍यांकरिता कृषी कार्यालयात उपलब्ध आहे; परंतु शेतकर्‍यांकडून लोकवर्गणी भरण्यास प्र ितसाद मिळत नसल्यामुळे हे साहित्य लाभार्थ्यांअभावी गावोगावी इतरत्र धूळ खात पडलेले आहे. कृषी विभागाकडून शेतकर्‍यांना वाटपासाठी येणारे साहित्य ठेवण्याकरिता गोदामच उपलब्ध नसल्याने कृषी कार्यालयाला हे साहित्य नाइलाजास्तव ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात किंवा कृषी सेवकांच्या घरात ठेवावे लागत असल्याचे वास्तव समोर येत आहे. गोदामासाठी भाड्याची तरतूद नसल्यामुळे कृषी विभागाला भाड्यानेही गोदाम घेता येत नाही. सद्य:स्थितीत तालुक्यातील वडगाव तेजन येथे पेरणी यंत्र व इतर काही कृषी साहित्य तसेच महारचिकना येथील मोटारपंप व पंपसेट, देऊळगाव कुंडपाळ येथे लेजर आदी साहित्य धूळ खात पडलेले आहे. यापैकी साहित्य चोरीला गेल्यास भुर्दंड कृषी विभागाला बसत आहे. तरी आलेले साहित्य ठेवण्यासाठी तालुकास्तरावर गोदामाची तरतूद होणे आवश्यक आहे.