शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातही पाण्यासाठी 'झुंज', बुलडाण्यातील सहा तालुक्यांत पाणीटंचाई कायम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 00:20 IST

शेगाव तालुक्यातील नागरिकांना आपली तहान भागविण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे. प्रशासनाकडून पुरेसे प्रयत्न होत असले तरी नागरिकांना मात्र पाणीटंचाई कधी दूर ही चिंता सतावत आहे.

- योगेश फरपटखामगाव : शेगाव तालुक्यातील नागरिकांना आपली तहान भागविण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे. प्रशासनाकडून पुरेसे प्रयत्न होत असले तरी नागरिकांना मात्र पाणीटंचाई कधी दूर ही चिंता सतावत आहे. घाटाखालील खामगाव, शेगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद या तालुक्यांमध्ये पावसाळा लागला तरी पाण्यासाठी भटकंती कायम आहे.बहुतांश गावातील जलपातळी घटली आहे. त्यामुळे चांगला पाऊस झाल्याशिवाय पाणीसमस्या दूर होणे कठीण आहे. शेगाव तालुक्यातील चिंचोली येथे पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. येथील बोअरवेल व विहिरींच्या पाण्याची पातळी घटल्याने मागील तीन महिन्यांपासून या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. गावात टँकर कधी येईल, याची नागरिक चातकाप्रमाणे वाट पाहत बसलेले असतात. गावात टँकर आले की, महिला, पुरुष, मुले, मुली टँकरवर पाणी भरण्यासाठी तुटून पडताना दिसतात. यावर्षी सुद्धा दोन टँकर येथे सुरू करण्यात आले आहेत.जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी कायमस्वरुपी उपाययोजना न केल्याने नागरिकांना पाणीप्रश्न भेडसावत असल्याचे नागरिकांनी लोकमतशी बोलताना सांगितले. या गावची लोकसंख्या ५००० आहे. गावातील पाणी प्रश्न लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पुढील वर्षात तरी येथील पाणीप्रश्न कायमचा निकाली लावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

कायमस्वरुपी उपाययोजनांकडे दुर्लक्षचगावात काही वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो, याची जाणीव प्रशासनाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी कित्येकदा प्रशासनाला निवेदन दिले. आंदोलने केलीत. मात्र गंभीरतेने याची दखल कुणीच घ्यायला तयार नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

टॅग्स :Waterपाणी