शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक कर्मचा-यांच्या रिक्त पदांमुळे एसटीला खोडा

By admin | Updated: January 20, 2015 00:53 IST

बुलडाणा जिल्ह्यात २४९ पदे रिक्त; वर्कशॉपमध्ये दुरूस्तीसाठी बसेसच्या रांगा.

सिद्धार्थ आराख / बुलडाणा: राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागातील सात आगारातील तांत्रिक कर्मचार्‍यांचे २४९ पदे रिक्त असल्यामुळे या रिक्त पदाचा फटका बसेस दुरूस्तीवर होत आहे. त्यातून प्रवासी वाहतुकीवर परिणाम होत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागात ४६३ बसेसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक केली जाते. अपुर्‍या व नादुरूस्त बसेसमुळे बहुतांश बसेस वारंवार दुरूस्त कराव्या लागतात; मात्र यासाठी लागणारे मनुष्यबळसुद्धा महामंडळाकडे पुरेसे नाही. बुलडाणा जिल्ह्यात एसटीचे सात आगारा आहेत. या आगारात असलेल्या वर्कशॉपला यांत्रिक कामगारांची तब्बल ६९१ पदे मंजूर आहेत. जिल्हा मुख्यालयी असलेल्या विभागीय कार्यशाळेत सर्वाधिक पदे आहेत. तथापि, जिल्ह्यात मंजूर असलेल्या ६९१ पदांपैकी २४९ पदे रिक्त असून, ४४२ कर्मचार्‍यांवरच एसटीचा गाडा हाकल्या जात आहे. या रिक्त पदांचा फटका बसेसच्या दुरूस्तीला बसत असून, या बसेस सुरळीत सुरू ठेवण्याचे आव्हान तोकड्या यंत्रणेवर पडत आहे. जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, खामगाव, मेहकर, मलकापूर, जळगाव जामोद आणि शेगाव या सात तालुक्यात महामंडळाचे आगार आहेत. या सर्व आगाराला लागून ४६३ बसेसच्या माध्यमातून ४४८ शेड्युल चालविले जातात. यातील बहुतांश बसेस कालबाह्य झालेल्या आहेत. यामुळेच भररस्त्यावर गाड्या ब्रेकडाऊन होण्याचे प्रमाण वाढत आहे. सातही आगारांतील अनेक बसेस आपल्या फेर्‍या आटोपून परतल्या की दुरूस्तीसाठी वर्कशॉपला पाठविल्या जातात, यासाठी प्रत्येक आगाराला स्वतंत्र वर्कशॉप देण्यात आले आहे. शिवाय जिल्ह्याचे एकत्रित विभागीय कार्यशाळा बुलडाणा येथे आहे. या सात आगारांच्या वर्कशॉपमध्ये एकूण मेकॅनिकलची ६९१ पदे आहेत. यातील केवळ ४४२ कर्मचारी कार्यरत असून, २४९ पदे अद्यापही रिक्त आहेत. शिवाय बुलडाणा येथील विभागीय कार्यशाळेत तब्बल ४८ पदे रिक्त आहेत. २४९ मेकॅनिकल कमी असल्याने बसेसची दुरूस्ती करताना अधिकारी, कर्मचार्‍यांना चांगलीच दमछाक करावी लागते. विभागीय कार्यशाळा बुलडाणा येथे ४८ पदे रिक्त आहेत. या पाठोपाठ खामगाव आणि चिखली या मोठय़ा वर्कशॉपमध्ये प्रत्येकी १४ पदे रिक्त आहेत, तर मेहकर येथे २0 तर मलकापूर येथे १२ पदे रिक्त आहेत. जळगाव जामोद येथे ६ तर बुलडाणा येथील वर्कशॉपला १९ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या ४६३ एस.टी बसेसपैकी शंभरावर बसेसची कालर्मयादा संपलेली असल्यामुळे या बसेस रस्त्यावर ब्रेकडावून होतात. मध्येच बंद होणार्‍या या बसेसमुळे प्रवासी त्रस्त झालेले आहेत. नादुरूस्त बसेसची संख्या मोठी असल्याने या बसेसला दररोज दुरूस्तीची गरज पडते. त्यामुळे एकाच वेळी अधिक बसेस दुरूस्तीला आल्यास अपुर्‍या मनुष्यबळाअभावी या बसेसला मुख्य वर्कशॉपमध्ये बुलडाणा येथे पाठविल्या जातात; पण येथेही मेकॅनिकलची संख्या कमीच असल्याने नादुरूस्त बसेस वेळेत दुरूस्त होत नाहीत. परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक सुभाष पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रिक्त पदांमुळे कामकाजावर काहीसा परिणाम होत असल्याचे स्विकारून ही रिक्त पदे भरली जावी, यासाठी पत्रव्यवहार सुरू असल्याचे सांगीतले.