शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शेतात ट्रॅक्टर फिरविल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

By admin | Updated: July 5, 2017 00:14 IST

एका गटातील ४ आरोपींना तर दुसऱ्या गटातील २ आरोपींना कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : शेतात ट्रॅक्टर फिरविल्याच्या कारणावरून हातातील काठ्या व लोखंडी पाईप कुऱ्हाड व तलवारीने मारहाण होऊन दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना तालुक्यातील नेकनामपूर येथे सोमवारी घडली. याप्रकरणी तामगाव पोलिसांनी दोन्ही गटातील ६ आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता या आरोपींना ७ जुलैपर्यंत ४ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे.याबाबत नेकनामपूर येथील गुलाबराव रामचंद्र यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, देविदास अगळते, मोहन अगळते, साहेबराव अगळते, चंचल अगळते, अमोल अगळते, अरूण अगळते, सचिन अगळते, विजय संतोष अगळते, पुंडलिक शेषराव अगळते यांनी गैरकायदेशीरपणे मंडळी जमवून शेतात ट्रॅक्टर फिरविल्याच्या कारणावरून त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून मारहाण केली व गंभीर जखमी करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला अशा आशयाच्या फिर्यादीवरून वरील १० आरोपींवर तामगाव पोलिसांनी कलम ३०७, ३२४, ५०४, १४३, १४७, १४८, १४९ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या गटातील अनिता साहेबराव अगळते यांनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीत म्हटले आहे की, गुलाब रामचंद्र अगळते, पंजाबराव अगळते, गौरव अगळते, रामचंद्र किसन अगळते, बाबुराव हरीचंद्र अगळते, प्रमोद हरीचंद्र अगळते यांनी गैरकायदेशीरपणे मंडळी जमवून घरासमोर जाऊन म्हणाले की, तुमच्या घरातील सांडपाणी माझ्या घराकडे येते तुमच्या मुलाने माझे शेतात ट्रॅक्टर का फिरविले व त्याच्या हातातील काठीने उजव्या हातावर मारहाण केली. तसेच इतर नातेवाईकांना लोखंडी पाईप आणि लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून वरील ७ आरोपींवर कलम ३२६, ३२४, ५०४, १४३, १४७, १४८, १४९ नुसार गुन्हा दाखल केला असून दोन्ही गटातील ६ आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या सहा आरोपींना ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.