शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

पावसाअभावी जळगाव जामोद तालुक्यातील ४२ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 2:42 PM

जळगाव जामोद :  गत दहा दिवसापासून जळगाव जामोद तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. परिणामी तालुक्यातील ४१ हजार ८०० हेक्टरवरील पीके धोक्यात आली असून यावर्षी सुध्दा फटका बसणार काय, या चिंतेने तालुक्यात वातावरण गंभीर बनले आहे.

ठळक मुद्देयावर्षी तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्याने नदी-नाले कोरडे ठण्ण आहेत.आसलगाव, पिंपळगाव काळे व वडशिंगी या सर्कलमध्ये पाऊस कमी असल्याने या भागातील पीके अगदी लहान आहे. जळगाव व जामोद या सर्कलमध्ये थोडा जास्त पाऊस असल्याने या परिसरातील सोयाबीनला फुलोरा आला आहे.

- नानासाहेब कांडलकरलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद :  गत दहा दिवसापासून जळगाव जामोद तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. परिणामी तालुक्यातील ४१ हजार ८०० हेक्टरवरील पीके धोक्यात आली असून यावर्षी सुध्दा फटका बसणार काय, या चिंतेने तालुक्यात वातावरण गंभीर बनले आहे. यावर्षी तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्याने नदी-नाले कोरडे ठण्ण आहेत.मागीलवर्षी कमी पावसाने कापूस, सोयाबीन या मुख्य पिकांना धक्का बसला. कपाशीवर शेंद्री बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली. यावर्षी तरी वेळेवर पाऊस येईल अशी अपेक्षा होती. परंतु जळगाव तालुक्यात तब्बल २५ दिवस पाऊस उशीरा आला. त्यामुळे शेतकºयांना जुनच्या शेवटी व जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करावी लागली. उशीरा पेरणी झाल्याने पीकेही अगदी लहान आहेत. त्यात गत दहा दिवसापासून पाऊस नसल्याने काही शेतातील पिके सुकु लागली आहे. शेतकरी हा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.उत्पादनात घट होण्याची शक्यतातालुक्यात सर्व सर्कलमध्ये सारखा पाऊस नाही. आसलगाव, पिंपळगाव काळे व वडशिंगी या सर्कलमध्ये पाऊस कमी असल्याने या भागातील पीके अगदी लहान आहे. तर जळगाव व जामोद या सर्कलमध्ये थोडा जास्त पाऊस असल्याने या परिसरातील सोयाबीनला फुलोरा आला आहे. तर कपाशी पात्यावर येत आहे. या पृष्ठभुमीवर जर दोन-तीन दिवसात वरूणराजाची कृपा झाली नाही तर उत्पादनात मोठी घट होवून शेतकरी हा आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे आहेत.पावसाचे प्रमाण गत पाच वर्षापेक्षाही कमीमागीलवर्षी ७ आॅगस्टपर्यंत तालुक्यात सरासरी पाऊस ३५१ मिमी झाला होता. यावर्षी मात्र आजतागायत फक्त २६३.७० मिमी पाऊस झाला आहे. गत २०१६ मध्ये याच तारखेपर्यंत ४५६ मिमी पाऊस झाला होता. तर सन २०१५ मध्ये ७ आॅगस्टपर्यंत ४७० मिमी पावसाची नोंद झाली होती. सन २०१४ मध्ये याच तारखेपर्यंत कोटी ३६१ मिमी पाऊस झाला होता. तर सन २०१३ मध्ये पावसाचे सर्व रेकार्ड तोडत ७ आॅगस्टपर्यंत ९११ मिमी पावसाची नोंद झाली होती. याचाच अर्थ असा की मागील पाच वर्षाचा आढावा घेतला तरी यावर्षी आजतागायत फक्त निम्मे पाऊस झाला आहे. या परिस्थितीवर कशी मात करावी, असा यक्ष प्रष्न शेतकºयांसमोर उभा आहे.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदagricultureशेती