मद्यपी, धांगडधिंगा करणारे वाहन चालक पोलिसांच्या रडारवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 13:36 IST2019-12-31T13:36:05+5:302019-12-31T13:36:23+5:30
नववर्षाला दारू पिऊन वाहन चालविणाºया वाहन चालकांची अल्कोहोल मापक यंत्राद्वारे तपासणी केली जाणार आहे.

मद्यपी, धांगडधिंगा करणारे वाहन चालक पोलिसांच्या रडारवर!
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : नव वर्षाचे स्वागत करताना धांगडधिंगा आणि दारू पिऊन वाहन चालविणाºया तरुणाईवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. नववर्षाला दारू पिऊन वाहन चालविणाºया वाहन चालकांची अल्कोहोल मापक यंत्राद्वारे तपासणी केली जाणार आहे. सोबतच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विविध ठिकाणी वाहनचालकांची पोलिसांकडून तपासणी केली जाणार आहे.
नव वर्षाच्या स्वागतासाठी आनंद साजरा करताना दारू पिण्यात येते. अनेकदा यातून वाद उद्भवतात. सोबतच अपघातही वाढतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शहर पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यामध्ये खामगाव शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. महत्वाच्या ठिकाणी फिक्स पॉर्इंट लावण्यात आले आहेत.
‘ब्रिथ अॅनालायझर’द्वारे तपासणी!
३१ डिसेंबर रोजी दारू पिऊन वाहन चालविणाºया वाहन चालकांची शहर पोलिसांच्यावतीने अल्कोहल मापक यंत्र (ब्रिथ अॅनालायझर) द्वारे तपासणी करण्यात येणार आहे.
मद्य पिऊन वाहन चालविणाºयांसोबतच वाहतूक नियम मोडणाºया वाहन चालकांविरोधात पोलिसांनी मोहिम उघडली आहे. पोलिस प्रशासनास सहकार्य करावे.
- सुनील आंबुलकर
शहर पोलिस निरिक्षक, खामगाव.