शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

उन्हाळी पिकाला दुष्काळाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 3:34 PM

बुलडाणा: जिल्ह्यात उन्हाळी पिकाचे सरासरी क्षेत्र तीन हजार ५० हेक्टर आहे. परंतू पाण्याअभावी यावर्षी उन्हाळी पिकाचे कुठलेच नियोजन अद्याप करण्यात आलेले नाही.  

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: जिल्ह्यात उन्हाळी पिकाचे सरासरी क्षेत्र तीन हजार ५० हेक्टर आहे. परंतू पाण्याअभावी यावर्षी उन्हाळी पिकाचे कुठलेच नियोजन अद्याप करण्यात आलेले नाही.  यंदा उन्हाळी पिकाला दुष्काळाचा फटका बसला असून गुरांच्या चाºयाचाही प्रश्न गंभीर बनत आहे. रब्बी हंगामातील तूर, हरभर, गहू ही पिके काढल्यानंतर उन्हाळी पिकांना सुरूवात होते. जिल्ह्यात साधारणत: मार्च महिन्यात उन्हाळी पिकांची पेरणी केली जाते. पावसाळा चांगला झाला, जलसाठ्यांची स्थिती समाधानकारक असली तर जिल्ह्यात उन्हाळी पिकाच्या सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी होते. परंतू यावर्षी अत्यल्प पर्जन्यमानामुळे   जिल्ह्यातील जलपातळी खालावली आहे. त्यामुळे जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. परिणामी जिल्ह्यातील उन्हाळी हंगामात घेतली जाणारी पिकांकडे शेतकºयांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते.  पाण्याअभावी उन्हाळी पिकांचे कुठलेच नियोजन शेतकरी किंवा कृषी विभगाने केले नाही. पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरीवर्ग मोठा चिंतेत सापडला आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पावसाची चांगली साथ  न मिळाल्यामुळे विहिरी, तलाव, कूपनलिकांमध्ये अत्यंत कमी जलसाठा आहे. काही ठिकाणचे जलस्त्रोत तर कोरडे पडलेले आहेत.  ही स्थिती पाहता बहुतांश शेतकरी बांधवांनी उन्हाळी पीक घेण्याचे नियोजन केले नाही. उपलब्ध पाण्याच्या भरवशावर तसेच या भागातील हलक्या प्रतिच्या जमिनीमध्ये येणारे पीक लावण्यात येते. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीलाच जलपातळी खालावल्याने याचा परिणाम उन्हाळी पिकांवर झाला आहे. 

 मागीलवर्षी ८१ टक्के पेरणीउन्हाळी पिकांचे क्षेत्र ३ हजार ५० हेक्टर असून मागीलवर्षी २ हजार ४६५ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिके घेण्यात आली होती. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ८१ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिके घेण्यात आल्यामुळे गुरांच्या चाºयासाठी थोडाबहुत आधार शेतकºयांना झाला होता. परंतू यावर्षी दुष्काळामुळे उन्हाळी पिके घेणे अवघड झाले आहे. 

 उन्हाळी मकाचा गुरांना आधारउन्हाळ्यात हिरवा चारा मिळणे दुरापास्त होते. परंतू उन्हाळी मका पिकाचा गुरांना चांगलाच आधार होतो. जिल्ह्यात उन्हाळी मकाचे सरासरी क्षेत्र ७८४ हेक्ट आहे. दरवर्षी या सरासरी क्षेत्रापेक्षा उन्हाळी मकाची पेरणी जास्तच होत आली आहे. मागील वर्षी जिल्ह्यात ११० टक्के क्षेत्रावर म्हणजे ८६१ हेक्टरवर उन्हाळी मकाची पेरणी झाली होती. २०१३ मध्ये अशाच दुष्काळी परिस्थितीत मका पिकाची लागवड करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यात गुरांच्या चाºयासाठी मोठी मदत झाली होती. 

 भाजीपालावर्गीय पिके संकटातजिल्ह्यात भाजीपालगावर्गीय पिकांचे प्रमाणही चांगले आहे. परंतू विहिर, कपनलीका यामध्ये जलसाठाच नसल्याने भाजीपालावर्गीय पिके संकटात सापडली आहेत. तर काही शेतकºयांनी भाजीपाला पिके उपटुन टाकल्याचे चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.