ट्रकच्या धडकेत कारचालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 11:40 IST2021-02-13T11:38:03+5:302021-02-13T11:40:04+5:30

Accident News अपघातात कार चालक निलेश साहेबराव दामोधर (वय-२६) रा. कृष्णा नगर नांदुरा हे ठार झाले.

Driver killed in truck crash | ट्रकच्या धडकेत कारचालकाचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत कारचालकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : भरधाव ट्रकने समोरुन येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कार चालक निलेश साहेबराव दामोधर (वय-२६) रा. कृष्णा नगर नांदुरा हे ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान नांदुरा -मलकापूर रोडवर हनुमान मुर्ती समोर घडली.
नांदुरा येथील निलेश दामोधर हे मित्रासह एमएच-१२, एक्स-७०५० या क्रमांकाच्या कारने मलकापूरकडून नांदुऱ्याकडे येत होते. हनुमान मुर्ती जवळ समोरुन येणाऱ्या युपी-८३, एटी-७५२१ या क्रमांकाच्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. अपघातात कारचालक निलेश दामोधर व त्यांचे दोन मित्र गंभीर जखमी झाले. जखमींना खामगाव येथे हलविण्यात आले. परंतु रस्त्यातच निलेश दामोधर यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या दोन मित्रांवर खामगाव येथे सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Web Title: Driver killed in truck crash