मिनीट्रकमधून पडल्याने चालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 16:30 IST2018-08-01T16:30:02+5:302018-08-01T16:30:50+5:30
मलकापूर : उभ्या मिनीट्रकमधून पडल्याने डोक्याला जबरदस्त मुकामार लागून चालकाचा मृत्यू झाला.

मिनीट्रकमधून पडल्याने चालकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : उभ्या मिनीट्रकमधून पडल्याने डोक्याला जबरदस्त मुकामार लागून चालकाचा मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग ६ वरील मौजे वाघूड शिवारात ही घटना बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, अशोक शंकरराव पवार (वय ६०) रा.चाळीसगाव मिनीट्रक (इकोनेट) क्र.एमएच१८-एए८१७९ या गाडीने नागपूर येथून नंदुरबारकडे निघाले होते. महामार्ग क्र.६ वर वाघुडनजीक त्यांनी मिनीट्रक थांबविला. लघुशंकेसाठी उतरत असताना खिडकीच्या वरील बाजुचा दांडा तुटला अन ते खाली पडले. बेशुध्द झाले येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक शुभांगी पाटील करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)