बुलडाण्यातील खामगावात दुहेरी हत्याकांड, एक आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 07:57 IST2019-12-21T07:57:18+5:302019-12-21T07:57:30+5:30

शहरात दोन तरुणांची चाकूने भोसकून व दगडाने ठेवून हत्या करण्यात आली.

Double murder in Khadgaon in Buldana! | बुलडाण्यातील खामगावात दुहेरी हत्याकांड, एक आरोपी अटकेत

बुलडाण्यातील खामगावात दुहेरी हत्याकांड, एक आरोपी अटकेत

खामगाव: शहरात दोन तरुणांची चाकूने भोसकून व दगडाने ठेवून हत्या करण्यात आली. ही घटना रात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशाल देशमुख(३२) व सचिन पवार(३३) अशी हत्या झालेल्या युवकांची नावे आहेत. रात्री दोन वाजताच्या सुमारास दोन्ही युवकांचे मृतदेह शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील घाटपुरी नाका भागात रक्ताच्या थारोळ्यात आढळले.

अवैध सावकारी आणि युवकांच्या दोन गटांतील वादातून या हत्याकांडाचा अंदाज व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थळ निरीक्षण व पंचनाम्यानंतर दोन्ही युवकाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. दरम्यान घटनेचे गांभीर्य पाहून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ खामगाव येथे दाखल झाले आहेत. या घटनेत एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

Web Title: Double murder in Khadgaon in Buldana!