डोणगाव : मद्याचा पेग भरला नाही म्हणून तलवारीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 01:23 IST2017-12-21T01:22:17+5:302017-12-21T01:23:14+5:30

डोणगाव : येथील पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या शेलगाव देशमुख येथे मद्याचा पेग भरला नाही, या कारणावरून एकावर तलवारीने हल्ला करून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी निखिल श्रीराम केळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Donegaon: The sword is not full of drunkenness so the sword is attacked | डोणगाव : मद्याचा पेग भरला नाही म्हणून तलवारीने हल्ला

डोणगाव : मद्याचा पेग भरला नाही म्हणून तलवारीने हल्ला

ठळक मुद्देशेलगाव देशमुख येथील घटनानिखिल श्रीराम केळे याच्या विरोधात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव : येथील पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या शेलगाव देशमुख येथे मद्याचा पेग भरला नाही, या कारणावरून एकावर तलवारीने हल्ला करून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी निखिल श्रीराम केळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल केळे याने गावातीलच सुनील केशवराव देशमुख यांना घरी बोलावून विविध कामे सांगितली. सोबतच धूम्रपान कर, मद्याचा पेग भरून दे, असे म्हणत त्याला विविध कामे सांगितली; मात्र त्यास सुनील देशमुख याने नकार दिल्याने निखिल केळेने घरातील तलवार काढून सुनीलवर हल्ला केला. त्यामध्ये सुनील देशमुखने हात आडवा केल्याने तो थोडक्यात बचावला; मात्र त्याच्या हाताला मार लागला. याप्रकरणी त्याने पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी विविध कलमान्वये निखिल केळे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास मुंढे, विष्णू जायभाये हे करीत आहेत.

Web Title: Donegaon: The sword is not full of drunkenness so the sword is attacked