डोणगाव : डोक्यावर क्रेनची शिबडी पडून सोळा वर्षीय मुलगा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 00:34 IST2018-01-14T00:34:27+5:302018-01-14T00:34:43+5:30
डोणगाव : जवळच असलेल्या ग्राम कनका येथे डोक्यावर शिबडी पडून सोळा वर्षीय मुलगा ठार झाल्याची घटना १३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली.

डोणगाव : डोक्यावर क्रेनची शिबडी पडून सोळा वर्षीय मुलगा ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव : जवळच असलेल्या ग्राम कनका येथे डोक्यावर शिबडी पडून सोळा वर्षीय मुलगा ठार झाल्याची घटना १३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली.
डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम कनका येथील शेतकरी रामचंद्र कुंडलीक ढोके यांच्या गट नंबर ४९ च्या शेतात विहीरीचे खोदकाम सुरू होते. यावेळी विहिरीवर काम करणार्या मजुराचे जेवनाचे डब्बे घेवून गेलेल्या दहावीत शिकत असलेल्या हरीओम मोहन इंगळे विहिरीत उतरला होता. यावेळी अचानक क्रेनमशिनचा गेर तुटल्याने मशिन पुर्ण पणे फ्री झाली आणी आरडा ओरड करताच विहीरीत असलेल्या हरीओम च्या डोक्यावर शिबडी पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गावकर्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. याप्रकरणी गजानन अजुर्ना इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डोणगाव पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. क्रेन मालकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.