खामगाव पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी संपेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 12:28 IST2020-11-18T12:28:33+5:302020-11-18T12:28:47+5:30

Khamgaon Municipal Counsil News मंगळवारी पालिकेतील अनेक विभागाचे अधिकारी कर्मचारी कार्यालयात परतले नव्हते. 

Diwali of Khamgaon Municipal Counsil employees is not over! | खामगाव पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी संपेना!

खामगाव पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी संपेना!

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : लागोपाठ तीन दिवसांची सुटी उपभोगल्यानंतरही मंगळवारी पालिकेतील अनेक अधिकारी, कर्मचारी आपल्या विभागात पोहोचले नव्हते. वरिष्ठ सुटीवर असल्याचा फायदा घेत काही विभागातील कर्मचाºयांनी चक्क आपले कक्ष कुलूप बंद ठेवल्याचा प्रकार मंगळवारी दिसून आला. 
शनिवारी दीपावलीमुळे पालिकेला सुटी होती. रविवारी शासकीय सुटी होती. तर सोमवारी भाऊबिजेची अशी लागोपाठ तीन दिवस सुटी असल्यानंतरही मंगळवारी पालिकेतील अनेक विभागाचे अधिकारी कर्मचारी कार्यालयात परतले नव्हते. 
हीच परिस्थिती विभाग प्रमुखांची दिसून आली. दरम्यान, सकाळी कुलूपबंद आढळून आलेले कार्यालय दुपारी साडेतीन वाजताही बंद अवस्थेत होते. वरिष्ठ अधिकारी कार्यालयात नसल्याची संधी साधत काही कर्मचारी, अधिकारी आल्यापावली घरी परतल्याची वस्तुस्थिती मंगळवारी ‘लोकमत’च्या रियॅलिटी चेकमध्ये दिसले. अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसल्याने कामे खोळंबली आहे.

Web Title: Diwali of Khamgaon Municipal Counsil employees is not over!