‘एक दिवा वंचितांसाठी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:42 PM2017-10-22T23:42:51+5:302017-10-22T23:44:05+5:30

धामणगाव बढे : वंचित, दलित आणि मागासवर्गीय हे शब्द सत्ते पर्यंत पोहचण्याचे साधन बनले. परंतु सत्ता मिळाली की वंचित हे  कायम वंचित राहतात. परंतु दलित, वंचित व मागास समाजाच्या  जिवनात देखील काही क्षण आनंदाचे यावे यासाठी सिंदखेडच्या  सरपंच विमल कदम यांनी कुटुंबासमवेत मागासवस्तीत  भाऊबिज साजरी केली व एक दिवा वंचितासाठी हा उपक्रम  राबविला. 

'For a Divine Woman' | ‘एक दिवा वंचितांसाठी’

‘एक दिवा वंचितांसाठी’

Next
ठळक मुद्देसिंदखेड सरपंचाचा उपक्रम मागासवस्तीत भाऊबीज साजरीलोकमत प्रेरणावाट

नवीन मोदे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव बढे : वंचित, दलित आणि मागासवर्गीय हे शब्द सत्ते पर्यंत पोहचण्याचे साधन बनले. परंतु सत्ता मिळाली की वंचित हे  कायम वंचित राहतात. परंतु दलित, वंचित व मागास समाजाच्या  जिवनात देखील काही क्षण आनंदाचे यावे यासाठी सिंदखेडच्या  सरपंच विमल कदम यांनी कुटुंबासमवेत मागासवस्तीत  भाऊबिज साजरी केली व एक दिवा वंचितासाठी हा उपक्रम  राबविला. 
यावेळी प्रवीण कदम, विनोद कदम, अँड.गणेशसिंग राजपूत  यांना मागासवर्गीय वस्तीतील सुमारे ६५ महिलांनी औक्षण केले.  सामाजिक कार्यकर्ते प्रविण कदम यांचे वतीने सदरहू महिलांना  साडी-चोळी भेट देण्यात आली. अनेक वर्षे ज्यांनी भाऊबीज  साजरी केली नाही. ज्यांना भाऊ नाही, अशा अनेक दिनदुबळ्या  महिलांना यानिमित्ताने भाऊ मिळाला. त्यांचा आनंद त्यांच्या  चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता. सिंदखेडच्या सरपंच विमल  कदम यांनी गावात अनेक कामे स्वखर्चाने करून गाव आदर्श  बनविले. त्यांचे कुटुंब मागील दोन वर्षापासून मागासवस्तीत  भाऊबीज साजरी करीत आहे. यावर्षी सिंदखेड येथील  मागासवस्तीत यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते. यावेळी अँड. गणेशसिंग राजपूत, पं.स.सभापती पुष्पा  चव्हाण, उखा चव्हाण, सरपंच विमल कदम, ग्रामपंचायत  पदाधिकारी प्रविण कदम, अर्जुन कदम यांचेसह गावकरी उपस् िथत होते.
अँड. गणेशसिंग राजपूत यांनी प्रविण कदम यांचा उपक्रम  प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगितले. तर सर्वत्र समाजा- समाजात दरी वाढत असताना भेदभाव वाढत असताना  भाऊबिजेच्या या निमित्ताने बहिण-भावाच्या नात्याचे नवे पर्व  सुरू होवून वंचितांना आधार मिळाला. तसेच फक्त भाऊबिजच  नव्हे तर संकटात असताना कधिही हाक द्या असे यावेळी प्रविण  कदम यांनी सांगितले. देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे, घेता  घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे, यापासून प्रेरणा घेत  अनेकांनी कार्य केले तर वंचित, दलित, मागास हे फक्त शब्द  नाही तर समाज आहेत याची जाणीव होईल.

वंचित, दलित, मागास समाजातील परिस्थिती अस्वस्थ करते,  त्यांच्या जिवनात काही क्षण आनंदाचे यावे यासाठी एक दिवा  वंचितासाठी हा उपक्रम. ग्रामपंचायत, आ.सपकाळ यांच्या  माध्यमातून या समाजासाठी भरिव काम करण्याचा संकल्प  आहे.
- प्रविण कदम, सिंदखेड.

Web Title: 'For a Divine Woman'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :diwaliदिवाळी