आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीने जिल्हा बँकेचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:37 IST2021-03-23T04:37:03+5:302021-03-23T04:37:03+5:30
- ग्रामीण अर्थकारणाला हातभार जिल्ह्याच्या २६ लाख लोकसंख्येपैकी २०.३७ टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. जिल्ह्यातील ८१ टक्के ...

आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीने जिल्हा बँकेचे प्रयत्न
- ग्रामीण अर्थकारणाला हातभार
जिल्ह्याच्या २६ लाख लोकसंख्येपैकी २०.३७ टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. जिल्ह्यातील ८१ टक्के शेतकरी हे अत्यल्प व अल्प भूधारक आहेत. त्यांच्याकडे जिल्ह्यातील एकूण शेती क्षेत्रापैकी ५८ टक्के शेतजमीन आहे. त्यांच्या आर्थिक गरजा ग्रामपातळीवरच पूर्ण करण्याच्या दृष्टिकोणातून ही डिजिटल बँकिंगची सुविधा देणारी मोबाईल व्हॅन उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यातील बँकिंग नेटवर्क पाहता ३१९६ व्यक्तींमागे एक बँकेची शाखा असे जिल्ह्यात समीकरण आहे. ग्रामीण भागात तर ते अधिक व्यस्त आहे. त्यामुळे थेट गावातच शेतकऱ्यांच्या हाती या माध्यमातून पैसा उपलब्ध करण्याचा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी विक्रम पठारे आणि जिल्हा बँकेचे सीईअेा डॉ. अशोक खरात यांनी स्पष्ट केले. त्यासाठीच नाबार्डच्या ‘एफआयएफ’अंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.