पाणीपुरी खाण्यावरून वाद; युवकावर चाकुने केले वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 20:01 IST2021-09-01T20:00:56+5:302021-09-01T20:01:02+5:30

Crime News : गाभणी येथील शाम रवींद्र जाधव (वय २४ ) व दाताळा येथील भास्कर मांगो काटे (वय ३०) या दोघांमध्ये वाद झाला.

Disputes over eating Panipuri; The youth was stabbed | पाणीपुरी खाण्यावरून वाद; युवकावर चाकुने केले वार

पाणीपुरी खाण्यावरून वाद; युवकावर चाकुने केले वार

मलकापुर : तालुक्यातील दाताळा येथे ३१ आॅगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान बस स्थानकावरील पाणीपुरीच्या दुकानावर पाणीपुरी घेण्यावरून दोन तरूणांमध्ये वाद झाला. वादातून एका तरूणावर चाकुने वार करण्यात आल्याने तरूण गंभीर जखमी झाला. 

गाभणी येथील शाम रवींद्र जाधव (वय २४ ) व दाताळा येथील भास्कर मांगो काटे (वय ३०) या दोघांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाल्याने भास्कर मांगो काटे याने धारदार चाकूने शाम रवींद्र जाधव याच्या पोटावर व मांडीवर चाकूचे वार केले. यात श्याम जाधव गंभीर जखमी झाला. याबाबतची फिर्याद शाम जाधवने मलकापुर ग्रामीण पोलीस स्टेशनला दिल्यावरून भास्कर काटेविरुद्ध कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शाम रवींद्र जाधव याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी भास्कर मांगो काटे याला पोलिसांनी अटक केली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.नामदेव तायडे करीत आहेत.

Web Title: Disputes over eating Panipuri; The youth was stabbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.