नांदुरा : भरधाव ट्रकच्या धडकेत जखमी झालेला येथील दुचाकीस्वार माणिकराव भागवत राठोड (वय ३० ) यांचा उपचारादरम्यान २३ एप्रिलच्या दुपारी मृत्यू झाला. शहरातील चावडी परिसरात आॅप्टीकल्सचे दुकान चालविणारा माणिकराव भागवत राठोड हा युवक १७ एप्रिलच्या रात्री लग्न समारंभ आटोपून खामगाव येथून नांदुरा येथे घरी परतत असताना पारखेड फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये जखमी झाल्याने राठोड यांना प्रथम खामगाव नंतर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, २३ एप्रिलच्या दुपारी उपचारादरम्यान माणिकराव राठोड यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}