बुलडाण्यातील प्रभाग ३ मध्ये घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:23 IST2021-07-20T04:23:43+5:302021-07-20T04:23:43+5:30

बुलडाणा : शहरातील प्रभाग क्र. ३, कमेला परिसरात गत काही दिवसांपासून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे़ गत ...

Dirt kingdom in Ward 3 of Buldana | बुलडाण्यातील प्रभाग ३ मध्ये घाणीचे साम्राज्य

बुलडाण्यातील प्रभाग ३ मध्ये घाणीचे साम्राज्य

बुलडाणा : शहरातील प्रभाग क्र. ३, कमेला परिसरात गत काही दिवसांपासून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे़ गत अनेक दिवसांपासून या परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलेले नाही़ त्यातच घंटा गाड्याही येत नसल्याचा आराेप स्थानिक नागरिकांनी केला आहे़ त्यामुळे, ईदपूर्वी या भागात स्वच्छता अभियान राबविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे़

शहरातील प्रभाग क्र. ३ कमेला परिसरातील घाणीमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशाने कमेला परिसरातील कत्तलखाना बंद करण्यात आला होता. तेव्हापासून तो जुगाऱ्यांचा अड्डा बनला आहे. येथे दिवसभर डुकरांचा मुक्त संचार असताे़ घंटागाड्या येत नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले आहेत़ घाणीमुळे परिसरातील नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे़ येत्या २१ जुलै राेजी बकरी ईदचा सण आहे. मुस्लिम समाजातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही ईद आहे़ बकरी ईदच्या पूर्वी परिसरात स्वच्छता करण्यात आली नाही तर परिसरातील घनकचरा उचलून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या दालनात टाकण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे़

नागरिकांचे आराेग्य धाेक्यात

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेची भीषणता अनेकांनी अनुभवली आहे़ त्यामुळे, नागरिकांच्या मनात काेराेनाची धास्ती आहे़ त्यातच परिसरात कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे़ परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी सुटली आहे़ याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी हाेत आहे़

लवकरच स्वच्छता अभियान राबवून नगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्र ३ मध्ये लवकरच स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे, असे नगरपालिकेचे मुख्याधिकारी स्वप्निल लंघाणे यांनी दिली़

Web Title: Dirt kingdom in Ward 3 of Buldana