शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बायोमेट्रिक यंत्रणेला निधीची अडचण

By admin | Updated: January 20, 2015 00:48 IST

स्वस्त धान्य दुकानाच्या योजनेसाठी २ कोटींची गरज : बुलडाणा जिल्हाधिका-यांकडून मिळणार ७५ लाखांचा निधी.

नीलेश शहाकार /बुलडाणा: शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य वाटप करताना दुकानदारांकडून मोठय़ा प्रमाणात होणारा काळा बाजार रोखण्यासाठी स्वस्त धान्य दुकानात आता बायोमेट्रिक यंत्रणा लावण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; मात्र या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुरेसा निधी मंजूर न झाल्यामुळे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानात बायोमेट्रिक यंत्र बसविण्यास निधीची अडचण निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना तहसील कार्यालयाकडून वेळेवर धान्य पुरवठा करण्यात येतो. रेशन दुकानदार महिन्याला आपला कोटा पूर्ण करून घेतात; मात्र काही दुकानदार लाभार्थ्यांना धान्य देण्याऐवजी त्याची विल्हेवाट काळ्या बाजारात लावून स्वत:चा स्वार्थ साधतात. त्यामुळे एपीएल, बीपीएलधारकांसह अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थीही धान्यापासून वंचित राहत आहेत.या संदर्भात महसूल विभागाकडे वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींचा विचार करून जुलै २0१४ मध्ये स्वस्त धान्य दुकानांच्या ठिकाणी बायोमेट्रिक पद्धत सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. स्वस्त धान्य दुकानात लावण्यात येणार्‍या या प्रणालीवर ह्यअंगठा लावा आणि धान्य मिळवाह्ण असा नावीन्यपूर्ण उपक्रम जळगाव (खान्देश), जालना जिल्ह्यात सुरू आहे. हा उपक्रम यानंतर बुलडाणा जिल्ह्यात टप्प्या-टप्प्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून प्राप्त झाली आहे. या योजनेतून शिधापत्रिकाधारक कुटुंबप्रमुख, विशेषत: महिला आपल्या परिसरातील संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांकडे जाऊन तेथील बायोमेट्रिक यंत्रावर आपला अंगठा लावून नोंद करतील. त्यानंतर यापुढे बायोमेट्रिक यंत्रावर अंगठा दाखवल्यानंतरच संबंधित लाभार्थ्याला धान्य मिळेल. या प्रणालीमुळे काळ्या बाजारावर अंकुश बसणार आहे.