शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

लोकसभा निवडणुकीपुर्वी धनगर आरक्षण लागू करावे : विकास महात्मे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 5:11 PM

मलकापूर : गेल्या सत्तर वर्षापासून धनगर समाजाची एस.टी. आरक्षणाची मागणी प्रलंबित आहे. विद्यमान सरकारने सत्तेत येण्यापुर्वी समाजाला दिलेले आश्वासन पाळावे व लोकसभा निवडणुकीपुर्वी आरक्षण लागु करावे, असे प्रतिपादन खासदार पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांनी मलकापूर येथे आयोजित बैठकीत शुक्रवारी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : गेल्या सत्तर वर्षापासून धनगर समाजाची एस.टी. आरक्षणाची मागणी प्रलंबित आहे. विद्यमान सरकारने सत्तेत येण्यापुर्वी समाजाला दिलेले आश्वासन पाळावे व लोकसभा निवडणुकीपुर्वी आरक्षण लागु करावे, असे प्रतिपादन खासदार पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांनी मलकापूर येथे आयोजित बैठकीत शुक्रवारी केले.स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला संबोधित करताना; राज्यसभा खासदार डॉ.महात्मे म्हणाले की, गेल्या निवडणुकीपुर्वी भाजपाने धनगर समाजाला आश्वासन दिले होते. एस.टी. आरक्षणासाठीची शिफारस केंद्राकडे करून समाजाची गेल्या सत्तर वर्षापासून प्रलंबित मागणी पूर्ण करू व धनगर आरक्षण लागू करू, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु चार वर्षे उलटूनसुध्दा अद्यापपर्यंत मागणी पूर्ण झाली नाही. मराठा आरक्षण, सवर्ण आरक्षण शासनाने दिले. या निर्णयाचे स्वागतच करतो; परंतु धनगर समाज सुध्दा आरक्षणाची वाट पाहत आहे. भाजपा सरकारबाबत धनगर समाज आशावादी असून, शासनाने विलंब न करता आरक्षण लागू करावे, ही आमची मागणी आहे. त्याकरीता २० जानेवारी रोजी वाशिम येथे सकाळी ११ वाजता धनगर आक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रभरातून या आंदोलनात समाज बांधव तथा सर्व पक्षीय नेते व पदाधिकारी व विविध संघटना सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील समाजबांधवांनी या आंदोलनात सहभागी व्हावे व सरकारला धनगर समाजाचा आक्रोश कळवावा. यातून सरकारला शासनाला गर्भित इशारा द्यावा, असे आवाहन यावेळी खासदार डॉ.विकास महात्मे यांनी केले.यावेळी धनगर समाज संघर्ष समितीचे राज्य सचिव हरीश खुने, धनविजय सारकर, जिल्हा संयोजक मधुकर फासे, धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष मनोहर खाळपे, तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे, विनोद सावळे, चंद्रकांत कवळे, रामचंद्र बोरसे, अ‍ॅड.कैलास बोरसे, रामेश्वर बाजोडे, अशोकराव हेले, विनय काळे, निंबाजी बाजोडे, शिवराज सुरळकर, विश्वनाथ वसतकार, संभाजी सहावे, विनायक बोरसे, योगेश पाचपोळ, रमेश बोरसे, निलेश सोनोने, विनायक सपकाळ, गजानन कवळे, गजानन वाघ, प्रभाकर वाघ, अनिल पाचपोळ, राजु नेमाडे, शांताराम पाचपोळ, गजानन बोरसे, यांच्यासह मलकापूर तालुक्यातील धनगर समाज बांधवाची यावेळी उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :MalkapurमलकापूरkhamgaonखामगावVikas Mahatmeविकास महात्मे