शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

‘डेडलाईन’ संपूनही बुलडाणा जिल्ह्यात महामार्गाची कामे अर्धवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 2:28 PM

मुदत संपून जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी ही कामे रखडलेली असल्याचे दिसून येत आहे.

- योगेश देऊळकार  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात सध्या सात ठिकाणी महामार्गाची कामे सुरू आहेत. यापैकी चार ठिकाणच्या कामांची मुदत जून २०१९ मध्येच संपलेली आहे. परंतु अद्यापही कामे पूर्ण झालेली नाहीत. डेडलाईन संपूनही महामार्गाची कामे अर्धवटच राहिल्याने विकासाच्या वाटेत अडचणी निर्माण होत असून दळणवळणाच्या समस्येत वाढ झाली आहे.राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने जिल्ह्यात दोन टप्प्यात महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात जून २०१७ मध्ये चार ठिकाणी ही कामे हाती घेण्यात आली होती. यामध्ये मेहकर-चिखली ३९.७ किमी, चिखली-खामगाव ५६.१० किमी, खामगाव-शेगाव २२.८ किमी व अजिंठा-बुलडाणा ४९.१३ किमी तर दुसऱ्या टप्प्यात जून २०१८ मध्ये चिखली-टाकरखेड ३९.६० किमी, टाकरखेड-जालना ४०.२६ किमी, नांदुरा-जळगाव जामोद २५ किमी या रस्त्याच्या कामास प्रारंभ झाला. यापैकी पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची मुदत जून २०१९ मध्येच संपली आहे. मात्र मुदत संपून जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी ही कामे रखडलेली असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू झालेल्या या रस्त्याचे काम सुरुवातीपासूनच संथगतीने सुरू असल्याने वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. अपघाताच्या घटनाही यामुळे घडल्या असून यामध्ये काहींना आपला जीवही गमवावा लागला असल्याचे वास्तव आहे.तर दुसºया टप्प्यात सुरू असलेल्या रस्त्यांचे काम देखील थंडावले असल्याचे चित्र आहे. यामुळे सबंधित रस्त्यावरून ये-जा करणाºया वाहनधारकांसह सर्व प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. नांदुरा-जळगाव जामोद या मार्गावर तर खोदून ठेवलेल्या रस्त्यावर पावसाळ्याच्या सुरुवातीला चिखल झाल्यामुळे वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. यामुळे सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागला.

काम मुदतीत पूर्ण न होण्याची कारणेमहामार्गाचे काम सिमेंट काँक्रीटीकरणाचे असल्याने या कामाला पाण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासते. मात्र कामादरम्यान पाण्याची तूट जाणवल्याने अनेकवेळा काम बंद ठेवण्याची वेळ ओढवली. झाडांची कत्तल व जंगल परिसरातून जाणाºया रस्ता कामासाठी वन विभाग तर विद्युत खांब स्थलांतरणासाठी महावितरणकडून परवाना उशीरा मिळाल्याने अनेक ठिकाणी कामे विलंबाने झाली. इतरही अडचणी आल्याने महामार्गाचे काम विहित मुदतीत पूर्ण करणे शक्य झाले नसल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून देण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेल्या रस्त्यांचे काम जवळपास ७० टक्क्यांपेक्षा जास्त तर दुसºया टप्प्यातील रस्त्यांचे काम ५० टक्के पूर्णत्वास गेले आहे. सर्व रस्त्यांची कामे वेगाने करण्यावर भर देण्यात येत आहे. वाहनधारकांना सध्या त्रास होत असला तरी येणाºया काळात या रस्त्याने त्यांनाच प्रवास करणे सुकर होईल.- के. बी. दंडगव्हाळ,उप अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणाhighwayमहामार्ग