शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
7
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
8
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
9
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
10
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
11
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
12
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
13
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
14
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
15
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
16
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
17
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
18
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
20
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
Daily Top 2Weekly Top 5

पशुसंवर्धन विभाग वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:01 IST

स्थानिक पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत नेहमी दांडी मारत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांअभावी पशुसवंर्धन विभाग ओस पडला आहे. परिणामी ग्रामीण भागातून दूरवरून येणाऱ्या पशुपालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देआरमोरी पंचायत समिती : अधिकारी व कर्मचाऱ्यांची दांडी

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : स्थानिक पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत नेहमी दांडी मारत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांअभावी पशुसवंर्धन विभाग ओस पडला आहे. परिणामी ग्रामीण भागातून दूरवरून येणाऱ्या पशुपालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पं.स.च्या पशुसंवर्धन विभागाचा भोंगळ कारभार या निमित्ताने समोर आला आहे. कार्यालय खुले मात्र टेबल, खुर्च्यावर कोणीच नाही, अशी स्थिती या कार्यालयाची दिसून येते.प्रस्तुत प्रतिनिधीने दोन दिवस कार्यालयीन वेळेत पं.स.च्या पशुसंवर्धन विभागात सतत भेट दिली असता, कार्यालय खुले, टेबल-खुर्च्या रिकाम्या. मात्र एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत असल्याचे दिसून आले नाही. ग्रामीण भागातून आलेले बरेचशे नागरिक कार्यालयाला भेट देऊन परत जात असल्याचे दिसून आले. येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्याने या पदाचा भार एका पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे. ते सुध्दा आठवड्यातून एक-दोन दिवस कर्तव्यावर दिसतात. इतर दिवशी मिटींगला गेले, दौऱ्यावर गेले असे येथील कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते. आरमोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. मात्र पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे तसेच रिक्त पदांमुळे तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाची सेवा पूर्णत: ढासळलीआहे. तालुक्याच्या शिवणी (खुर्द) येथे अज्ञात आजाराने पाच गुरे नुकतीच दगावली. याला डॉक्टर व कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. मात्र या योजनांची जनजागृती केली जात नसल्याने तालुक्यातील बºयाच पशुपालकांना योजनांची परिपूर्ण माहिती नसल्याचे वास्तव आहे.विभागाच्या कामाची चौकशी कराअधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे पं.स.च्या पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची पूर्णत: वाट लागली आहे. त्यामुळे विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, अधिकाºयांचे बैठकानिमित्त होणारे दौरे तसेच उचल केलेले भत्ते याची सखोल चौकशी करण्यात यावी, पं.स.च्या पशुसंवर्धन विभागात कार्यालयीन वेळेत गैरहजर राहणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील पशुपालकांनी केली आहे. या बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे.