शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

ग्रामसेवकांच्या मागण्या तत्वत: मान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 2:51 PM

मुख्य सचिवांनी ग्रामसेवकांच्या मागण्या तत्वत: मान्य करत आंदोलन मागे घेण्याबाबत विनंती केली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांनी विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारले आहे. या पृष्ठभूमीवर उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेत मुख्य सचिवांसोबत ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली.यामध्ये मुख्य सचिवांनी ग्रामसेवकांच्या मागण्या तत्वत: मान्य करत आंदोलन मागे घेण्याबाबत विनंती केली. मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतीचे काम खोळंबले असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शासनाच्या योजनांची ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणी करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार गांभीर्य दाखवत नसल्याने या संवर्गात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.विविध मागण्यांबाबत वेळोवेळी झालेल्या चर्चा, बैठकात देण्यात आलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली नाही. त्यामुळे राज्यातील हजारो ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीला कूलूप लावून चाव्या गटविकास अधिकाºयांकडे दिल्या आहेत. संघटनेतर्फे सर्वच आमदार, मंत्री महोदयांनी निवेदने सादर केली होती. उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही जिल्हा कार्यकारीणीने निवेदन देवून मागण्याबाबत अवगत करून दिले होते. बावनकुळे यांनी आंदोलनाची दखल घेत २८ आॅगस्टरोजी संध्याकाळी संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे व राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांच्यासह पदाधिकाºयांना बैठकीसाठी आमंत्रीत केले. त्यानुसार मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या दालनात बैठक झाली. यामध्ये मुख्य सचिवांनी ग्रामसेवकाच्या मागण्या समजून घेतल्या. ग्रामसेवक संवर्गास दरमहा ३ हजार रुपये प्रवास भत्ता मंजूर करावा, ४ ग्रामसेवकांची शैक्षणिक अर्हतेत बदल करावा. कोणत्याही शाखा पदवीधर ग्रामसेवक भरतीत समाविष्ट करावा, ग्रामविकास अधिकारी पदे वाढवावीत, ग्रामसेवकांवरील अतिरिक्त कामाचा बोजा लादू नये, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी काढून सुधारणा करावी या मागण्या प्रामुख्याने मंजूर करण्याबाबत पदाधिकाºयांनी आग्रह धरला. मुख्य सचिवांनी याबाबत आश्वस्त केले. मागण्यांना तत्वत: मान्यताही दिली व आंदोलन मागे घेण्याबाबत सुचीत केले. मात्र पदाधिकाºयांनी लेखी आश्वासन मागितले. ते मिळू न शकल्याने जोपर्यत शासन लेखी देत नाही.तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. आमच्या मागण्या रास्त आहेत. शासन नेहमीच आंदोलन मागे घेण्याबाबत विनंती करते.एकदा आंदोलन मागे घेतले की, पुन्हा जैसे थे. ग्रामसेवकांच्या पदरी काहीही पडत नाही. त्यामुळे आम्ही जोपर्यत लेखी मिळत नाही. तोपर्यत आंदोलन सुरुच ठेवणार आहोत.- प्रशांत जामोदे, राज्य सरचिटणीस, राज्य ग्रामसेवक संघटना, महाराष्ट्र.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव