कुजलेले अर्भक आढळले, अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल; येळगाव शिवारातील घटना

By संदीप वानखेडे | Updated: August 13, 2023 19:50 IST2023-08-13T19:49:08+5:302023-08-13T19:50:04+5:30

'ते'  अर्भक पाच ते सहा महिन्यांचे...

Decomposed infant found, case registered against unknown persons; Incidents in Yelgoon Shivara | कुजलेले अर्भक आढळले, अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल; येळगाव शिवारातील घटना

कुजलेले अर्भक आढळले, अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल; येळगाव शिवारातील घटना

संदीप वानखडे / बुलढाणा : शहरातील चिखली रस्त्यावर येळगाव शिवारात पाच ते सहा महिन्यांचे अपरिपक्व अर्भक १३ ऑगस्ट राेजी आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चिखली रस्त्यावर असलेल्या येळगाव शिवारात भागवत रामराव पांढरे यांना पांढऱ्या रुमालात पाच ते सहा महिन्यांचे अपरिपक्व अर्भक आढळले. हे अर्भक कुजलेले असल्याने उग्र वास येत हाेता. त्यांनी याविषयी बुलढाणा शहर पाेलिसांना माहिती दिली. या माहितीच्या आधारे पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. तसेच अर्भक जप्त केले. या प्रकरणी बुलढाणा शहर पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पाेलिस नाईक प्रकाश दराडे करीत आहेत.

Web Title: Decomposed infant found, case registered against unknown persons; Incidents in Yelgoon Shivara