खडकपुर्णा कालव्याजवळ  मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 12:31 IST2019-04-15T12:30:28+5:302019-04-15T12:31:47+5:30

अंढेरा: आमोना शिवारात खडकपुर्णा कालव्याजवळ ५५ वर्षीय व्यक्तीचा  मृतदेह सोमवारी सकाळी आढळला आला.

The deathbody found near the Khadakapurna canal |  खडकपुर्णा कालव्याजवळ  मृतदेह आढळला

 खडकपुर्णा कालव्याजवळ  मृतदेह आढळला


अंढेरा: आमोना शिवारात खडकपुर्णा कालव्याजवळ ५५ वर्षीय व्यक्तीचा  मृतदेह सोमवारी सकाळी आढळला आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. 
देऊळगाव राजा तालुक्यातील आमोना गावाला लागुन असलेला खडकपुर्णा कालव्याजवळ संदिप सखाराम गोळे यांच्या मालकीच्या  गट नंबर १०० मध्ये शेत आहे. या शेतात आमोना येथील रहिवाशी रमेश नामदेव मघाडे (५५) यांचा आज सकाळी मृतदेह आढळला. या परिसरात कालव्याचे काम सुरु असल्याने मृत रमेश मघाडे यांच्या शेतातील धुºयावरुन ट्रॅक्टरचे चाक गेल्याने ट्रॅक्टर चालक दलपत किसन वानखेडे व रमेश मघाडे यांच्यामध्ये १४ एप्रील रोजी वाद झाला होता. त्या दिशेने सध्या तपासाची चक्रे आहेत. घटनास्थळी अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार कारेगांवकर सह पोफळे, डुकरे, झिने सह दाखल झाले.

Web Title: The deathbody found near the Khadakapurna canal