दुचाकी अपघातात व्यक्तीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 15:33 IST2020-02-11T15:32:49+5:302020-02-11T15:33:08+5:30
४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी बुलडाणा - खामगाव मार्गावरील सुंदरखेड बसथांब्याजवळ घडली.

दुचाकी अपघातात व्यक्तीचा मृत्यू
बुलडाणा : दुचाकीला मिनीट्रकची धडक बसल्याने एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी बुलडाणा - खामगाव मार्गावरील सुंदरखेड बसथांब्याजवळ घडली.
अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी येथील गोपाल नागोराव वाघ (२७) व त्यांचा मित्र हरिभाऊ देवलाल गर्जे (४०) हे दोघे कामानिमित्त बुलडाण्यात आले होते. १० फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास एमएच-३०-बीजी-४९७२ क्रमांकाच्या दुचाकीने दोघेही खामगाव रोडने निघाले होते. सुंदरखेड बसथांब्याजवळ समोरील काळीपिवळीच्या चालकाने अचानक वाहन थांबविले. काळीपिवळीवर धडकणार तोच दुचाकी चालविणाऱ्या हरिभाऊ गर्जे यांनी ब्रेक मारले. त्यामुळे दुचाकी घसरून दोघेही सडकेवर पडले. त्याचवेळी खामगावकडून आलेल्या एमएच-४३-एफ-१२०५ क्रमांकाच्या मिनीट्रकच्या चालकाने हरिभाऊ गर्जे यांना धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोपाल वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला.