ढोरपगाव येथील प्रवासी निवाऱ्यात युवकाचा मृत्यू, बुलढाण्यातील घटना

By अनिल गवई | Updated: April 10, 2023 13:46 IST2023-04-10T13:45:43+5:302023-04-10T13:46:33+5:30

घटनेमुळे परिसरात एकच खळबळ

Death of a young man in the passenger shelter at Dhorpagaon | ढोरपगाव येथील प्रवासी निवाऱ्यात युवकाचा मृत्यू, बुलढाण्यातील घटना

ढोरपगाव येथील प्रवासी निवाऱ्यात युवकाचा मृत्यू, बुलढाण्यातील घटना

अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव (जि. बुलढाणा): तालुक्यातील ढोरपगाव येथील प्रवासी निवाऱ्यात एका ३५ वर्षीय युवकाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना रविवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रामा एकनाथ साबे रा. सुटाळा असे मृतक युवकाचे नाव आहे. ढोरपगाव शिवारात शेती असल्यामुळे रविवारी तो शेतीच्या मशागती साठी गेला होता. दरम्यान पाऊस आल्यामुळे रात्री तो ढोरपगाव येथील प्रवासी निवार्यात थांबला होता. तितक्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. तत्पूर्वी युवकाचे ढोरपगाव येथील नातेवाईक घटनास्थळी पोहोचले होते.

घटनेची माहिती मिळताच, पिंपळगाव राजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पंचनामाकरून युवकाचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव येथील सामान्य रूग्णालयात नेण्यात आले.

Web Title: Death of a young man in the passenger shelter at Dhorpagaon