साखरखेर्डा : साखरखेर्डा येथून जवळच असलेल्या गुंज येथील मजुराचा विहिरीत पडून मृत्यू झाला. गुंज येथील पाच मजूर शेलगाव काकडे येथे सरकटे नामक शेतकर्याच्या विहिरीवर विहीर खोलीकरणाचे काम करीत होते. क्रेनची पट्टी निघाल्याने मोहन भागवत तुपकर या २२ वर्षीय युवकाचा तोल गेल्याने तो विहिरीत पडला. त्याच्या पोटाला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. उपरोक्त घटना ३ मे रोजी दुपारी घडली. त्याला तातडीने रुग्णालयात हलविले. औरंगाबाद येथे उपचार सुरु असतांना ५ मे रोजी त्याचा मृत्यू झाला. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर गुंज येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
विहिरीत पडल्याने मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2017 02:33 IST