विजेचा खांब अंगावर पडून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 10:37 IST2017-12-02T10:36:58+5:302017-12-02T10:37:11+5:30

विजेचा खांब डोक्यात पडून 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गिरडा शिवारातील ही घटना आहे. शुक्रवारची (1 डिसेंबर) ही घटना आहे. 

The death of an 11-year-old boy | विजेचा खांब अंगावर पडून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू  

विजेचा खांब अंगावर पडून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू  

बुलडाणा : विजेचा खांब डोक्यात पडून 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गिरडा शिवारातील ही घटना आहे. शुक्रवारची (1 डिसेंबर) ही घटना आहे.  आदित्य समाधान गायकवाड असे मृत मुलाचे नाव आहे. आदित्य आईसोबत शुक्रवारी दुपारी शेतात गेला होता. दरम्यान, शेतात असलेल्या विजेच्या खांबाला दिलेल्या तारांच्या ताणावर तो लोंबकळलेला असता हा खांब त्याच्या अंगावर पडला व या घटनेत गंभीर जखमी झाला. यानंतर आदित्यला स्थानिकांनी ताबडतोब बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराठी दाखल केले.

मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचारी चोपडे यांनी दिली. त्यासंदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालयातून प्राप्त कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास बुलडाणा पोलीस करीत आहेत.

Web Title: The death of an 11-year-old boy