सिलींडरच्या स्फोटात बहीण- भाऊ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 16:21 IST2019-03-11T16:21:13+5:302019-03-11T16:21:37+5:30
लोणार : घरातील गॅस सिलींडरच्या स्फोटात बहीण भाऊ जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास तालुक्यातील पिंपळखुटा येथे घडली.

सिलींडरच्या स्फोटात बहीण- भाऊ ठार
लोणार : घरातील गॅस सिलींडरच्या स्फोटात बहीण भाऊ जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास तालुक्यातील पिंपळखुटा येथे घडली. ज्ञानेश्वर माधवराव रसाळ (वय ७) व काजल माधवराव रसाळ (वय ५) अशी मृतांची नावे आहेत. स्फोट इतका भयंकर होता की दोघेही जागीच जळून खाक झाले. स्फोट नेमका कशामुळे घडला याचे कारण अद्याप कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच लोणार नगर परिषदेची अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी पोहचली व आग आटोक्यात आणण्याचे प्रयन्त सुरू केले. नायब तहसीलदार हेमंत पाटील, पीएसआय उकंडराव राठोड,रामु गीते हे घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे संपुर्ण गावात शोककळा पसरली आहे.