Crime: अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याप्रकरणी दोघे गजाआड
By सदानंद सिरसाट | Updated: October 8, 2022 14:58 IST2022-10-08T14:57:36+5:302022-10-08T14:58:12+5:30
Crime News: दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्यानंतर त्या तब्बल दिड महिन्याने परतल्या. त्यांच्यावर शारीरिक अत्याचार झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आल्याने मलकापूर पोलिसांनी दोघांना गजाआड केले.

Crime: अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याप्रकरणी दोघे गजाआड
सदानंद सिरसाट -
बुलढाणा - दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्यानंतर त्या तब्बल दिड महिन्याने परतल्या. त्यांच्यावर शारीरिक अत्याचार झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आल्याने मलकापूर पोलिसांनी दोघांना गजाआड केले. त्यांच्या विरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. आरोपींना १० आँक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीचा आदेश न्यायालयाने दिला.
राष्ट्रीय महामार्गावरील एका गावानजिक तांड्यात राहत असलेली अल्पवयीन मुलगी १३ आगस्ट रोजी दुपारी शौचास जाण्यासाठी निघाली, ती परतलीच नाही. कुटुंबियांनी रात्री शहर पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी पोलिसांनी तपास चक्रे फिरवली. त्या अल्पवयीन मुलीचा तपास लागला नाही. तपासात त्याच परिसरातील आणखी एक अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच उघड झाले. त्यामुळे एकाच परिसरातून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचे उघडकीस आले.
पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक संजय ठाकरे यांच्या पथकाने तपास सुरू केला. त्यावेळी दोन वेळा आरोपींनी गुंगारा दिला. त्यातच तब्बल दीड महिन्यानंतर दोन्ही अल्पवयीन मुली ३ आक्टोंबर रोजी परिसरात परतल्या. ६ आक्टोबर रोजी त्या शहर पोलिसात हजर झाल्या. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांच्यावर शारीरिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. शुक्रवारी आरोपी श्रावण देविदास भोसले (२०), प्रमोद उर्फ रामदास विक्रम सोळुंके (२२) या बेलाड फाट्यावरील दोघांना गजाआड केले. तसेच आधीच्या गुन्ह्यात कलम ३७६, (२)(एन)सह पोटकलम पो.स्को. अन्वये गुन्हा दाखल केला. त्यांना १० आँक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती तपास अधिकारी संजय ठाकरे यांनी दिली. त्या अल्पवयीन मुलीवर मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये शारीरिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आल्याने पोलिस पथक घटनास्थळाच्या पंचनाम्यासाठी रवाना झाल्याची माहिती त्यांनी दिली.