कृउबासच्या दोन संचालकांविरुध्द गुन्हा
By Admin | Updated: June 10, 2017 01:54 IST2017-06-10T01:54:22+5:302017-06-10T01:54:22+5:30
शेगाव शहर पोलिसात दोन संचालकांविरोधा त गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कृउबासच्या दोन संचालकांविरुध्द गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : शेगाव येथील केंद्रावर खरेदी विक्री संस्था आणि बाजार समितीच्या काही कर्मचार्यांना हाताशी धरून काही संचालक आणि व्यापार्यांनी आपल्याकडील हजारो क्विंटल तूर नाफेड केंद्रावर मोजल्याचे दिसून आले. या प्रकरणी शुक्रवारी शेगाव शहर पोलिसात दोन संचालकांविरोधा त गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शेगाव बाजार समितीचे संचालक श्रीधर पांडुरंग पाटील आणि नीलेश प्रेमकुमार राठी यांनी त्यांच्याकडील आपल्याकडील अपेक्षित उत्पन्नापेक्षा जास्त तूर विकल्याचे दिसून आले आहे. श्रीधर पाटील यांनी १९८ क्विंटल, तर राठी यांनी ३२0 क्विंटल तूर विकून एकूण २६ लाख १५ हजार ९00 रुपयांनी शासनाची फसवणूक केल्याची फिर्याद प्रभारी सहायक निबंधक रमेश अंभोरे यांनी शेगाव शहर पोलिसात दिली.
या तक्रारीवरून श्रीधर पांडुरंग पाटील व नीलेश प्रेमकुमार राठी या संचालकांविरुद्ध कलम ४२0, ४६५, ४६८, ४७१, ३४ भादंविनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसात गुन्हे दाखल होताच दोन्ही आरोपी फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. येथील शासनाच्या तूर खरेदी केंद्रावर तूर खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचे समोर आले होते. एका शेतकर्याने माहिती अधिकार अं तर्गत मिळविलेल्या माहितीत धक्कादायक माहिती समोर आली होती.