CoronaVirus : दिवाळीनंतर बुलडाणा जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये वाढले रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 15:57 IST2020-11-25T15:57:00+5:302020-11-25T15:57:08+5:30
CoronaVirus in Buldhana चार दिवसात जिल्ह्यात ३६२ कोरोना बाधीत आढळून आले

CoronaVirus : दिवाळीनंतर बुलडाणा जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये वाढले रुग्ण
ल ोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: दिवाळीनंतरच्या चार दिवसात बुलडाणा जिल्ह्यात बाधीत रुग्ण सापडण्याचे प्रमाण तुलनेने कमी झाले होते तरी प्रामुख्याने चार तालुक्यात कोरोना बाधीतांचा आकडा वाढल्याचे एकंदरीत चित्र आहे. चार दिवसात जिल्ह्यात ३६२ कोरोना बाधीत आढळून आले. तर २८७ जणांनी कोरोनावर मात केली होती. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या आता ११ हजारांच्या टप्प्यात पोहोचली असून बरे झालेल्यांची संख्या साडेदहा हजारांच्या आसपास पोहोचली आहे. बुलडाणा जिल्ह्यात दिवाळीनंतरच्या चार दिवसात बुलडाणा तालुक्यात २७, चिखली ३३, देऊळगाव राजा १४, सिंदखेड राजा ३४, लोणार १२, मेहकर १५, खामगाव २०, शेगाव २१, संग्रामपूर सहा, जळगाव जामोद ३५, नांदुरा २४, मलकापूर दहा आणि मोताळा ३४ या प्रमाणे बाधीत रुग्ण आढळून आले. तिघांचा मृत्यू दिवाळीनंतरच्या चार दिवसा तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. नेहमीच्या तुलनेत मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होते. जिल्ह्यात कोरोना बाधीतांच्या मृत्युचे प्रमाण तेही राज्याच्या तुलनेत कमी असून सध्य स्थितीत जिल्ह्याचा मृत्युदर हा १.२२ टक्के आहे.