शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

CoronaVirus in Buldhana : आणखी तीन पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या आठ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 9:59 AM

खामगाव, देऊळगाव राजा व चिखली येथील तिघांचा यामध्ये समावेश आहे.

बुलडाणा : शहरातील एकाचा बळी घेतल्यानंतर कोरोना विषाणूने बुलडाणा जिल्ह्यात हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून, रविवारी आणखी तीघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या खामगाव, देऊळगाव राजा व चिखली येथील तिघांचा यामध्ये समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांचा संख्या आता ८ झाली असून, यापैकी एकाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला आहे.बुलडाणा जिल्ह्यातील एकून ३० जण दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. या सर्वांचा शोध घेऊन त्यांचे स्वॉब नमुणे तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत. यापैकी तिघांचे नमुणे पॉझिटिव्ह आले आहेत. १२ नमुणे निगेटिव्ह आले असून, १५ नमुणे अद्याप प्रलंबित आहेत. बुलडाणा जिल्ह्यातून पाच मार्च पासून आजपर्यंत एकूण ८३ व्यक्तींचे स्वॅब नमुने हे नागपूर येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी आतापयंत ६३ जणांचे स्वॅब नमुने प्राप्त झाले आहेत. कालपर्यंत ही संख्या ५३ होती. दरम्यान, यापैकी पाच जणांचे रिपोर्ट हे पॉझीटीव्ह आले होते. त्यातील एकाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला होता तर अन्य चार जण हे मृत व्यक्तीच्या निकट संपकार्तील होते. ते सध्या आयसोलेशन कक्षात आहेत. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृतीही स्थिर असल्याचे शनिवारी दुपारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी सांगितले. दरम्यान, आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसगार्बाबत संदिग्ध म्हणून गणल्या गेलेल्या ११२ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी शंका आलेल्या ८३ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले होते. त्यातील २० नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबीत आहे. सध्या बुलडाणा जिल्ह्यातील १२ नागरिक हे आयसोलेशन वॉर्डमध्ये (अलगीकरण कक्ष) आहेत. यातील सात जण बुलडाणा येथील, तीन जण खामगाव येथील तर दोन जण शेगाव येथील आयसोलेशन कक्षात आहेत.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस