शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

CoronaVirus in Buldhana : आणखी ६९ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या  ६२५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 12:23 IST

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही ६९ व्यक्तीं कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही ६९ व्यक्तीं कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या ६२५ झाली आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३८० अहवाल बुधवारी प्राप्त झाले. त्यापैकी ३११ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालामध्ये एक प्रयोग शाळेतून आलेला अहवाल तर ६८ जण हे रॅपीड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत.यामध्ये सर्वाधिक कोरोना बाधीत हे खामगाव शहरात आढळून आले असून त्यांची संख्या २९ आहे. देऊळगाव राजा शहरात १७ जण, जळगाव जामोदमध्ये दोन, शेगावमध्ये सहा, नांदुरा येथे पाच, बुलडाणा शहरात एक, मेहकर तालुक्यातील नागापूर येथे एक, चिखली शहरात सहा आणि मलकापूरमध्ये एक या प्रमाणे ६९ रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत.दुसरीकडे १३ बाधीतांनी कोरोनावर मात केल्याने १५ जुलै रोजी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये मलकापुरमधील मंगल गेट मधील पाच, आळंद येथीलएक, खामगाव बसस्थानकानजीकच्या एक महिलेसह पाच जण, शेगाव तालुक्यातील आळसणा येथील दोन आणि मलकापूर शहरातील आणखी एका महिलेचा समावेश आहे.आतापर्यंत पाच हजार ३३९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्याच प्रमाणे आतापर्यंत २८५ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. सध्या ३५ संदिग्ध रुग्णांच्या अहवालांची प्रतीक्षा असून अ‍ॅक्टीवर असलेल्या ३१९ बाधीतांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. जिल्हयात आतापर्यंत १८ कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी दिली. जिल्हयात सध्या झपाट्याने बाधीत रुग्ण वाढत आहे.

करवंड येथील रुग्णाचा मृत्यूचिखली तालुक्यातील करवंड येथील ४० वर्षीय व्यक्तीचा बुलडाणा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवावर बुलडाणा येथील जुन्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रारंभी स्थानिकांनी त्यास विरोध केला होता. मात्र नंतर स्थानिकांचा विरोध मावळला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा