शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
4
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
5
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
6
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
7
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
8
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
9
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
10
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
11
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
12
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
13
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
14
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
15
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
16
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
17
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
18
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
19
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
20
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?

कोरोनाच्या चाचण्या वाढणार; बुलडाणा जिल्ह्याला दोन हजार रॅपीड टेस्ट किट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 10:53 IST

बुलडाणा जिल्ह्यात दोन हजार रॅपीड टेस्ट किट मिळाल्या असून कोरोना संसर्गाच्या चाचण्या त्यामुळे वाढण्यास मदत होणार आहे.

- नीलेश जोशी  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील तब्बल एक लाख ३१ हजार १९ नागरिक हे अद्यापही प्रतिबंधीत क्षेत्रात राहत असून कोरोनाच्या संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यात दोन हजार रॅपीड टेस्ट किट मिळाल्या असून कोरोना संसर्गाच्या चाचण्या त्यामुळे वाढण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे जागतिक संसर्ग रोग निवारण दिनीच या रॅपीड टेस्ट किटद्वारे तपासणी कशी करावी याचे प्रशिक्षणही आरोग्य यंत्रणेला दिल्या जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.परिणामी बुलडाणा जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या तपासणीस आता वेग येणार असून जिल्ह्यातील आणखी जवळपास साडेचार टक्के नागरिकांचे आरोग्य विषयक स्क्रीनींग होण्यास मदत होईल. त्यामुळे २९ लाख लोकसंख्येपैकी जवळपास तीन लाख लोकसंख्येमधील संदिग्धांची तपासणी करून त्यांच्यावर वेळेच उपचार करणे शक्य होईल. त्यामुळे कोरोनाचा जिल्ह्यात वाढता संसर्ग रोखण्यास मोठी मदत होणार आहे.बुलडाणा जिल्ह्यात कोरोना संसर्गाने सध्या डोके वर काढले असून कोरोनाचे त्रिशतक झाले आहे. प्रामुख्याने मलकापूर, खामगाव, शेगाव, सिंदखेड राजा, जळगाव जामोद, लोणार, देऊळगाव राजा, मोताळा या तालुक्यात कोरोनाचे संक्रमण वाढण्याची भीती असून त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर बैठकांचे सत्र सध्या सुरू करण्यात आले असून तालुकानिहाय माहिती संकलीत करून आगामी काळात जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.दोन दिवसापूर्वी विभागीय आयुक्तांनी बुलडाण्यामध्ये सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेवून कोरोनाचा जिल्ह्यातील वाढता संसर्ग रोखण्यासाठी गंभीरतेने पावले उचलण्याचे निर्देश दिले होते. प्रतिबंधीत क्षेत्रात दररोज करण्यात येणारा आरोग्यविषयक सर्व्हे अधिक गांभिर्याने करण्यात यावा, अशा सुचना दिल्या होत्या.त्यानंतर आता बुलडाणा जिल्ह्यास दोन हजार रॅपीट टेस्ट किट (अ‍ॅन्टीगेन किट) उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राची संख्या १०५ वर पोहोचली असून त्यापैकी २० प्रतिबंधीत क्षेत्र शिथील करण्यात आले आहेत. सध्या ८५ प्रतिबंधीत क्षेत्रात नियमित स्वरुपात सर्व्हेक्षण करण्यात येत असून एक लाख ३१ हजार १९ नागरिकांचे नियमीत सर्व्हेक्षण करण्यात येत असून त्यासाठी ५५२ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातील १६७ भाग कोरोना रुग्ण सापडल्यामुळे प्रभावीत असून यात काही गावे व शहरी भागातील काही प्रभागांचा समावेश आहे.

शहरातून जाणाऱ्या हायवेवरही देखरेख? सध्या आंतरजिल्हास्तरावर प्रवासासाठी रोखटोक नसल्यामुळे महामार्गावरून प्रवासादरम्यानही कोरोना संसर्गाचे संक्रमण होण्याची भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर जड वाहतूक तथा महामार्गावरील वाहने शहरातून न जावू देता त्यांना बायपासचा वापर करण्यास बाध्य करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर विचार विनिमय सुरू आहे. प्रामुख्याने बुलडाणा, नांदुरा, सिंदखेड राजा, मोताळा सारख्या ठिकाणी वाहने ही शहरातूनच जातात. त्यामुळे त्यातून कोण आले, कोण उतरले याबाबत फारशी माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे खबरदारी घेवून प्रसंगी अनावधाने संक्रमीत व्यक्तीकडून संसर्ग होण्याची भीती असते. अशा पार्श्वभूमीवर याबाबतही काही उपाययोजना करता येतील का? हा मुद्दाही प्रशासकीय पातळीवर विचाराधीन असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा