Corona Cases in Buldhana : ९०१ रुग्णांची काेराेनावर मात; ११३ पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 11:39 IST2021-06-01T11:39:20+5:302021-06-01T11:39:27+5:30

Corona Cases in Buldhana: साेमवारी केवळ ११३ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

Corona Cases in Buldhana: 901 patients overcome corona; 113 Positive | Corona Cases in Buldhana : ९०१ रुग्णांची काेराेनावर मात; ११३ पाॅझिटिव्ह

Corona Cases in Buldhana : ९०१ रुग्णांची काेराेनावर मात; ११३ पाॅझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा  : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून, साेमवारी केवळ ११३ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच ९०१ रुग्णांनी काेराेनावर मात केली असून, २२८१ काेराेना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये  बुलडाणा शहर १३, बुलडाणा तालुका  ०४,   मोताळा तालुका  ०३,  खामगाव शहर ०५,  खामगाव तालुका १८, शेगाव शहर ०५,  शेगाव तालुका ०१,   चिखली शहर ०४,  चिखली तालुका १२, मलकापूर शहर ०१ , मलकापूर तालुका ०२,  दे. राजा शहर ०२,   दे. राजा तालुका ०२,   संग्रामपूर तालुका ०७,   सिं. राजा शहर ०१, सिं. राजा तालुका ०७,   मेहकर शहर ०५, मेहकर तालुका ०३,   जळगाव जामोद तालुका  ०३,    नांदुरा शहर ०१, नांदुरा तालुका ०४, लोणार शहर ०२, लोणार तालुका ०२,  परजिल्ह्यातील चार जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान इसोली, ता. चिखली येथील ७५ वर्षीय महिला, चिखली येथील ५५ वर्षीय महिला, सुटाळा, ता. खामगाव येथील २८ वर्षीय पुरुष, जिगाव, ता. नांदुरा येथील ७५ वर्षीय महिला, मेहकर येथील ७५ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

Web Title: Corona Cases in Buldhana: 901 patients overcome corona; 113 Positive