Corona Cases in Buldhana :  ८ जणांचा मृत्यू; १२०  पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 11:48 AM2021-05-31T11:48:03+5:302021-05-31T11:48:12+5:30

Corona Cases in Buldhana: ३० मे रोजी ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, तपासणीमध्ये १२० जण पॉझिटिव्ह आढळले.

Corona Cases in Buldhana: 8 killed; 120 positive | Corona Cases in Buldhana :  ८ जणांचा मृत्यू; १२०  पॉझिटिव्ह

Corona Cases in Buldhana :  ८ जणांचा मृत्यू; १२०  पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने अेासरत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात असले तरी ३० मे रोजी ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, तपासणीमध्ये १२० जण पॉझिटिव्ह आढळले. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण ३ हजार २८२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३ हजार १६२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
रविवारी पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यात २७, खामगाव १२, शेगाव एक, देऊळगाव राजा १०, चिखली ९, मेहकर २५, मलकापूर २, नांदुरा १०, लोणार १२, मोताळा ९, जळगाव जामोद २, सिंदखेड राजा १ याप्रमाणे १२० जण कोरोनाबाधित आढळून आले. दरम्यान, संग्रामपूर तालुक्यात तपासणीत एकही जण कोरोनाबाधित आढळला नाही. 
उपचारादरम्यान रविवारी जिल्ह्यात ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये लोणार झोपडपट्टी भागातील ६५ वर्षीय व्यक्ती, बुलडाणा तालुक्यातील हतेडी येतील ७२ वर्षीय पुरुष खामगावमधील कडगाव येथील ६४ वर्षीय महिला, वाडेगाव येथील २९ वर्षीय महिला,  बुलडाण्यातील ७५ वर्षीय महिला, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात येत असलेल्या वडोदा तांगडा येथील ६५ वर्षीय महिला तसेच बुलडाणा शहरानजीकच्या नांद्राकोळी येथील ४५ वर्षीय व्यक्ती आणि रायपूर येथील ७६ वर्षीय  व्यक्तीचा मृतांमध्ये समावेश आहे.
दुसरीकडे ५९४ जणांनी रविवारी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयांतून सुटी देण्यात आली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ४ लाख ७८ हजार ७१५ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ८१ हजार ४४२ कोरोनाबाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी मृत्यूचे प्रमाण वाढलेले असल्याचे चित्र आहे. त्यावरही नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे.

Web Title: Corona Cases in Buldhana: 8 killed; 120 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.