Corona cases in Buldhana  : १३ जणांचा मृत्यू, ५५४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 10:36 AM2021-05-24T10:36:09+5:302021-05-24T10:36:14+5:30

Corona cases in Buldhana: १३ जणांचा २३ मे रोजी मृत्यू झाला असून ५५४ जण तपासणीत कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

Corona cases in Buldhana: 13 killed, 554 positive |  Corona cases in Buldhana  : १३ जणांचा मृत्यू, ५५४ पॉझिटिव्ह

 Corona cases in Buldhana  : १३ जणांचा मृत्यू, ५५४ पॉझिटिव्ह

Next

बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनामुळे १३ जणांचा २३ मे रोजी मृत्यू झाला असून ५५४ जण तपासणीत कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दरम्यान, प्रयोगशाळेत तपासणीसाठी  पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या ४ हजार ७१० जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४१५६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
कोरोनाबाधितांमध्ये बुलडाणा तालुक्यातील १५२, खामगाव  १०३, देऊळगाव राजा तालुक्यातील ४३, चिखली तालुक्यातील ४४, मेहकर  ५०, मलकापूर  १७, नांदुरा तालुक्यातील ३२, लोणार  ५२, मोताळा  १४, जळगाव जामोद ८, सिंदखेड राजा  १४ आणि संग्रामपूर २५ जणांचा समावेश आहे. दरम्यान, शेगाव तालुक्यातील एकही जण तपासणीमध्ये बाधित आढळून आला नाही.
दुसरीकडे उपचारादरम्यान जिल्ह्यात कोरोनामुळे १३ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये खामगाव तालुक्यातील घाटपुरी  ६० वर्षीय महिला, सुटाळा येथील ४२ वर्षीय व्यक्ती, गावंढळा गावातील ५३ वर्षीय व्यक्ती, मेहकर तालुक्यातील भोसा येथील ५३ वर्षीय महिला, सिंदखेड राजा तालुक्यातील गोरेगावातील  ८१ वर्षीय व्यक्ती, लोणार तालुक्यातील वेणी येथील ८० वर्षीय पुरुष, मेहकर तालुक्यातील नांद्रा धांडे येथील ८० वर्षीय पुरुष, चिखली तालुक्यातील भानखेड येथील ५८ वर्षीय पुरुष, नांदुरा तालुक्यातील ३७ वर्षीय महिला, जळगाव जामोद तालुक्यातील चावरा येथील ७० वर्षीय व्यक्ती, नांदुरा तालुक्यातील शेंबा येथील ५८ वर्षीय पुरुष, बुलडाणा शहरानजीकच्या साखली येथील ६५ वर्षीय पुरुष सिंदखेड राजा तालुक्यातील  शेंदुर्जन येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा यामध्ये समावेश आहे. 
दुसरीकडे ७८२ जणांनी २३ मे रोजी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या संदिग्धांपैकी  ४ लाख ४८ हजार ५५४ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर ७६ हजार ९८५ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. 
दरम्यान कोरोनामुळे रविवारी जिल्ह्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे.  त्यामुळे २३ मे रोजीचा जिल्ह्याचा मृत्यूदर हा २.३४ टक्क्यांवर गेला आहे. दुसरीकडे बाधित व्यक्ती बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे.

Web Title: Corona cases in Buldhana: 13 killed, 554 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.