शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Pawar पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका...
2
राज्य भाजपात मोठे बदल होणार?; दिल्लीत पार पडणार महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची बैठक
3
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
4
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
5
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
6
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
7
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
8
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
9
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
10
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
11
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
12
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
13
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
14
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
15
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड
16
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
17
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
18
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित
19
राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक
20
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद

सहकाराने सजली माणुसकीची भिंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 1:27 PM

बुलडाणा : स्थानिक सहकार विद्या मंदिरमधील विद्यार्थ्यांच्यावतीने बुलडाणा शहरात ८० ठिकाणी शुक्रवारी व शनिवारी बुलडाणा अर्बनच्या अध्यक्षा कोमल झंवर यांच्या नेतृत्वात स्वच्छता मोहीम  राबविण्यात येत आहे. या मोहिमेमधये वर्ग १ ते १० वी सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होत बुलडाणेकरांना स्वच्छतेसाठी आवाहन केले. आपले बुलडाणा शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जबाबदारी ही आपली असून, त्यासाठी ...

बुलडाणा : स्थानिक सहकार विद्या मंदिरमधील विद्यार्थ्यांच्यावतीने बुलडाणा शहरात ८० ठिकाणी शुक्रवारी व शनिवारी बुलडाणा अर्बनच्या अध्यक्षा कोमल झंवर यांच्या नेतृत्वात स्वच्छता मोहीम  राबविण्यात येत आहे. या मोहिमेमधये वर्ग १ ते १० वी सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होत बुलडाणेकरांना स्वच्छतेसाठी आवाहन केले. आपले बुलडाणा शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जबाबदारी ही आपली असून, त्यासाठी आपण जागरुक असणे आवश्यक असल्याचे मत विद्यार्थ्यांनी बुलडाणेकरांसमोर मांडले. सदर मोहिम  स्टेट बोर्डचे विद्यार्थी राबविणार आहेत. सर्वात आनंददायक बाब म्हणजे या विद्यार्थ्यांसोबत पालकदेखील सहभागी होत आहेत. बुलडाणा शहर स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत.केवळ बुलडाणा शहरच नव्हे तर चिखली शहरात देखील १४ आॅक्टोबर रोजी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यासोबतच दिवाळी ही सर्वांची आनंदात साजरी होणे ही मनोकामना ठेवून विद्यार्थ्यांना कपडे, लहान मुलांचे ड्रेस, खेळणी दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर साहित्य शाळेत जमा केले. ‘माणुसकीची भिंत’ या सामाजिक कार्याच्या ठिकाणी हे साहित्य उपजिल्हाधिकारी ललितकुमार वºहाडे, कोमलताई झंवर, प्राचार्य अलागार सामी, जनसंपर्क अधिकारी विक्रांत सराफ यांच्या उपस्थितीत दान करण्यात आले. याप्रसंगी ग्रंथपाल नरेंद्र लांजेवार, छत्रछाया फाऊंडेशनचे अजय दराखे, मिलिंद चिंचोळकर, प्रमोद टाले, सुरेश कावळे, योगेश सुरडकर, पंकज राठोड, चेतनांकुरचे महेंद्र सौभागे यांच्यासह रणजितसिंग राजपूत, गावंडे, नितीन शिरसाठ, जितेंद्र कायस्थ, पप्पु राऊत, नितीन कोटकर, सहकार विद्यालयाचे मुख्याध्यापिका मोहिनी ससे, अरुण पवार यांच्यासह विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होते. पुढील पाच दिवस विविध साहित्य गोरगरीब जनतेसाठी त्याठिकाणी देण्यात येणार आहे. तसेच विविध आश्रमशाळेत देखील सदर साहित्य भेट म्हणून देण्यात येणार आहे. तसेच चिखली शहरात देखील सदर साहित्य भेट म्हणून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या या दोन्ही सर्जनशील उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सहकार विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी या सामािजक कार्यातून खºया अर्थाने दिवाळी साजरी केली आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :social workerसमाजसेवक