शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
3
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
4
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
5
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
6
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
7
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
8
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
9
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
10
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
11
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
12
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
13
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
14
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
15
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
16
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
17
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
18
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
19
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
20
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात

उघड्यावर थुंकणे सुरुच; कारवाईचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 12:19 PM

Spit in the open आदेशाचे पालन तर सोडाच बेजबाबदार नागरिक सार्वजनिक जागांवर  बिनधास्त थुंकताना दिसत आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव  : शिंकल्याने तसेच थुंकल्याने  लाळेतून उडणाऱ्या तुषारांपासून कोरोनाचा झपाट्याने प्रसार होतो. ही बाब लक्षात घेता कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी व सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिकांना तोंडावर मास्क लावण्याचा आदेश आहे.  त्या आदेशाचे पालन तर सोडाच बेजबाबदार नागरिक सार्वजनिक जागांवर  बिनधास्त थुंकताना दिसत आहेत. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर अवघ्या जगातच नागरिकांना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले. बाधित व्यक्ती शिंकल्याने तसेच बोलताना  लाळेतील तुषार हवेत उडतात व त्याच्या संपर्कात येणारी व्यक्तीही बाधित होऊ शकते.यासाठीच तोंडावर मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले.   मात्र मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा कहर कमी झाला असून, बाधितांची संख्या कमी झाली आहे. परिणामी, जिल्हा प्रशासनाकडूनही पूर्वी होती ती सक्ती शिथिल करण्यात आली आहे. याचा गैरफायदा काही बेजबाबदार नागरिक घेत आहेत. कित्येक नागरिक सार्वजनिक स्थळी उघड्यावरच सर्रास थुंकताना दिसून येत आहेत. धावत्या गाडीवरून जात असतानाच थुंकणे, गुटखा खाऊन भर रस्त्यावर थुंकणे हे प्रकार खामगाव  शहरात अगदी क्षुल्लक झाले आहेत. त्याकडे  पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. 

गुटखा खाणाऱ्यांमुळे सर्वाधिक धोका   दिवसभर तोंडात गुटखा भरून ठेवणारे जागा मिळेल तेथे थुंकतात. हा प्रकार अत्याधिक धोक्याचा असून, अशात एखाद्या बाधितापासून कित्येकांना कोरोना व अन्य संसर्गजन्य आजारांची  लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता आता  प्रशासनाने  उघड्यावर थुंकणाऱ्यांना दणका देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा