शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

कंटेनरने प्रवासी वाहनाला चिरडले; १३ जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 17:04 IST

मलकापूर (जि. बुलडाणा) :  भरधाव कंटेनरने एका प्रवासी वाहनास चिरडल्याने झालेल्या अपघातात १३ जण ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देएम.एच.४६- एम.क्यू.७९२५ ही गाडी सुमारे १५ प्रवासी घेवून अनुराबाद कडे निघाली होती. धरणगाव वळणावर विरूध्द दिशेने येत असलेल्या एम.एच.४०-बी.जी-९११३ या क्रमांकाच्या भरधाव कंटेनरने प्रवासी गाडीस चिरडले. अपघातानंतर तब्बल १ तासाच्या प्रयत्नानंतर ही गाडी कंटेनरखालून बाहेर काढण्यात यश आले.

मलकापूर (जि. बुलडाणा) : भरधाव कंटेनरने एका प्रवासी वाहनाला चिरडल्याने १३ जण ठार तर दोघे जण जखमी झाले. ही दुर्देवी घटना सोमवारी दुपारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील धरणगाव वळणावर नजीक घडली. या घटनेत मलकापूर तालुक्यातील अनुराबाद येथील सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या गावावर शोककळा पसरली आहे.एम.एच.४६- एम.क्यू.७९२५ ही गाडी सुमारे १५ प्रवासी घेवून अनुराबाद कडे निघाली होती. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील धरणगाव वळणावर विरूध्द दिशेने येत असलेल्या एम.एच.४०-बी.जी-९११३ या क्रमांकाच्या भरधाव कंटेनरने प्रवासी गाडीस चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की, या घटनेत प्रवासी वाहनाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. अपघातानंतर तब्बल १ तासाच्या प्रयत्नानंतर ही गाडी कंटेनरखालून बाहेर काढण्यात यश आले. यात छगन शिवटकर आणि गोकुळ शिवटकर रा. बुरहाणपूर यांना गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले. त्यांना रूग्णालयात नेत असतानाच वाटेतच त्यांचीही प्राणज्योत मालवली. त्यामुळे मृतकांच्या संख्या १३ वर पोहोचली. तर वनिता प्रभाकर इंगळे (४०) रा. बहापुरा आणि गोकुळ भालचंद्र बेलोकार (३०) रा. बुरहाणपूर  हे दोघे जखमी झाले आहेत.  या अपघातामुळे तब्बल दीड तासापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.  कंटेनरमध्ये बारूद असल्याने या कंटेनरखालून अपघातग्रस्त प्रवासी वाहन काढताना पोलिस आणि मदतकार्य करणाºयांना चांगलीच दमछाक करावी लागली.  

मृतांमध्ये १३ जणांचा समावेश!या भीषण अपघातात छगन राजू शिवटकर (२६), सतीश छगन शिवटकर (०६) रा. नागझरी,  विरेंद्र भालचंद्र बेलोकार (०८), सोनीबाई छगन बेलोकार (२५), मीनाबाई बेलोकार (४०) रा. बुरहाणपूर,  अशोक लहू फिरके (५०), नथ्थुजी वामन चौधरी (४०), सुगदेव किसन बोराडे (३०),  अनिल मुकुंद ढगे (४०), छाया गजानन खडसे (३७) , सुरेखा प्रकाश भारंबे (४०)रा. अनुराबाद  यांच्यासह मृतांमध्ये समावेश असलेल्या आरती आणि रेखा अशा दोन ओळख अद्याप पटली नाही.(तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :AccidentअपघातMalkapurमलकापूरkhamgaonखामगावNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6