शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मिळ वनस्पतीचे संवर्धन प्रत्येकाचेच दायित्व - धनंजय मिसाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 20:19 IST

पर्यावरण रक्षक आणि राज्यातील पहिल्या ‘पॉकीट’ बीज बँकेचे प्रणेते धनंजय मिसाळ यांच्याशी साधलेला संवाद...

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क निसर्ग आल्हाददायी आणि जीवनदायी आहे. मात्र, मनुष्य स्वस्वार्थासाठी त्याची अपरिमित हानी करीत आहे. निसर्गाच्या ºहासामुळे  मनुष्यासमोर अनेक समस्या उभ्या राहत आहेत. त्यामुळे  वेळीच सावध होऊन निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाने सजग व्हावे. दुर्मिळ वनस्पतींच्या संवर्धनाचा वसा जोपासणारे... पर्यावरण रक्षक आणि राज्यातील पहिल्या ‘पॉकीट’ बीज बँकेचे प्रणेते धनंजय मिसाळ यांच्याशी साधलेला संवाद...

       दुर्मिळ वनस्पतीचे कंद आणि बियां किती जणांना वितरीत केल्यात?फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात येणाºयांना तसेच पोस्टाने दोन पाकीटं पाठविणाºया जवळपास दोन हजारावर नागरिकांना विविध देशी वृक्ष-वेलींच्या बिया पोस्टाने पाठविल्या आहेत. जंगल भ्रंमती केल्यानंतर सापडलेल्या कोणत्याही झाडा-वनस्पतीच्या बिया  संकलित करणे व इच्छुकांना पोस्टाद्वारे पाठवणे हा आता आपला छंद झाला आहे.

आतापर्यंत प्रामुख्याने आपण कोठे-कोठे दुर्मिळ वनस्पतींच्या बिया दिल्या ?नोकरी सांभाळून जंगलात सापडलेल्या दुर्मिळ वनस्पतींच्या बिया, कंदमुळे संकलित केल्यानंतर फेसबूकवरील मित्रांना माहिती दिली जाते. देशभरात मोठी मित्रसंख्या आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपºयासहीत आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, तेलंगाना, राजस्थान, मध्यप्रदेश आणि हरियाणा राज्यातील मित्रांना पोस्टाने बियां, कंदमुळं पाठविली आहेत.

पॉकिट बीज बँकेच्या यशात आपणास सहकार्य कुणाचे?निश्चितच पर्यावरण प्रेमी मित्रांच्या सहकार्यामुळे चार हजारावर वनस्पतींच्या बियां आणि कंदमुळांची बीज बॅक कार्यान्वित झाली. त्यामुळे पहिले श्रेय पर्यावरणप्रेमी मित्रांचे असले तरी, मला घडविण्यात माझा लहान भाऊ संजय मिसाळ याचा मोलाचा वाटा आहे. त्याची मदत झाली नसती तर, कदाचित मी याक्षेत्रात आणि काहीच नसतो. पत्नी अनिता आणि मुलगा गितेश हा देखील या कार्यात मदत करतो.

दुर्मिळ वनस्पती संकलन, संवर्धनाची प्रेरणा कोठून मिळाली?बालपणापासून निसर्गाची मनाला ओढ आहे. मात्र, निसर्गाशी ‘नाळ’ जोडल्या गेली, ती बाबांच्या मामी आणि माझ्या आजी शेवंताबाई वाळके रा. अकोली जहांगीर यांच्यामुळेच. थोडक्यात आजीबाईच्या ‘निसर्ग’प्रेमामुळेच मी लहानपासून निसर्गाशी समरूप झालो. आजी शेतात रानभाज्या आणि नैसर्गिक वनस्पती लावत असे. उन्हाळ्यात बियांचे संकलन करीत असे, आजीची ‘हिरवाई’ची कृती बालमनावर घट्ट कोरल्या गेली. आजी हीच आपला पहिला निसर्ग गुरू आहे. पुढे निसर्ग आणि समाजातील जुन्या जाणत्यांनी माझी निसर्ग चळवळ प्रगल्भ केली. पर्यावरण प्रेमी मित्रांनी या चळवळीला उभारी दिली. वडिलांचेही मोठं योगदान या उपक्रमात आहे.

 लोप पावत चाललेली दुर्मिळ वनस्पती माझ्या परसबागेतच नव्हे तर जमिनीवर कुठेतरी जीवंत रहावी. हेच आपलं अंतिम ध्येय आहे. गत काही वर्षांत निसर्गाबद्दल समाजाचा दृष्टीकोन बदलत आहे. ही आनंददायी बाब असली तरी,  निसर्ग संवर्धन ही ‘लोक’चळवळ होणे गरजेचे आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत