तूर खरेदीसाठी काँग्रेसचे आंदोलन
By Admin | Updated: June 10, 2017 01:59 IST2017-06-10T01:59:09+5:302017-06-10T01:59:09+5:30
जिल्हा मार्केटिंग अधिका-यांना कागदपत्रांसह उचलून आणले!

तूर खरेदीसाठी काँग्रेसचे आंदोलन
बुलडाणा : तुरीच्या शेवटच्या दाण्यापर्यंंत खरेदी केली जाईल, हे शासनाने दिलेले आश्वासन मोडीत काढीत तूर खरेदी बंद केल्यामुळे आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात शेतकरी व काँग्रेस कार्यक र्त्यांंनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयात जाब विचारण्याकरिता धडक दिली. मात्र, संबंधित अधिकारी उत्तर देऊ न शकल्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांंनी जिल्हा मार्केटिंग अधिकार्यांना कागदपत्रांसह वाहनात बसवून जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आले.
काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह १४ जणांनी केलेल्या उपोषणाच्या वेळी शासनातर्फे संबंधित अधिकार्यांनी तुरीच्या शेवटच्या दाण्यापर्यंंत खरेदी केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर अचानक तूर खरेदी बंद करण्यात आली. सध्या जिल्ह्यातील शेतकर्यांकडे ४ लाख २0 हजार क्विंटल तूर पडून आहे. याचा जाब विचारण्याकरिता आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी कार्यकर्ते व शेतकर्यांसह जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. तब्बल दीड तास चर्चा केल्यानंतरही जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. त्यामुळे आ. सपकाळ यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी व सर्व कागदपत्रे सोबत घेऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे चर्चेसाठी आणले. येथे जिल्हाधिकार्यांपुढे तूर विक्री करणार्या शे तकर्यांवर होणार्या अन्यायाबाबत माहिती दिली. शेतकर्यांचा तुरीचा शेवटचा दाणा असेपर्यंंत तूर खरेदी करू, असे आश्वासन सरकारने दिले होते, याची आठवण आ. सपकाळ यांनी करून दिली. यावर जिल्हाधिकार्यांनी सदर बाब शासनाला कळवितो व बंद झालेल्या तूर खरेदीबाबत सकारात्मक निर्णय घेतो, असे आश्वासन दिले. त्यावर सोमवारी सकारात्मक निर्णय झाला नाही, तर लोकशाही मार्गाने आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला.
यावेळी आ. हर्षवर्धन सपकाळ, संजय पांढरे, सत्येंद्र भुसारी, विष्णू पाटील, जि. प. सदस्य जयश्री शेळके, रसूल खान, सुनील तायडे, अँड. शरद राखोंडे, अमोल तायडे, आरिफ खान, प्रभाकर वाघ, झाकीर कुरेशी, दत्ता काकस, गजनफर खान, अँड. विजयसिंग राजपूत, रिजवान सौदागर, मो. शाफिक, साहेबराव चव्हाण, रघुनाथ नरोटे, चेतन पानसर, योगेश परसे, इरफान पठाण, विक्रम देशमुख, नीलेश जाधव, इजाज खान, सुरेश बोचरे, अँड. शेख, बबलू मावतवाल, रियाज ठेकेदार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.