देऊळगाव साकरशा येथील बसस्थानकाची कामे पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:36 IST2021-03-23T04:36:54+5:302021-03-23T04:36:54+5:30
देऊळगाव साकरशा येथून शेगाव ते पंढरपूर रस्ता हा सिमेंट काँक्रीटचा होत आहे. या रस्त्याबरोबरच इतर काही बांधकामे पूर्ण करणे ...

देऊळगाव साकरशा येथील बसस्थानकाची कामे पूर्ण करा
देऊळगाव साकरशा येथून शेगाव ते पंढरपूर रस्ता हा सिमेंट काँक्रीटचा होत आहे. या रस्त्याबरोबरच इतर काही बांधकामे पूर्ण करणे बाकी आहे. यामध्ये ग्रामपंचायत रस्त्यावर संबंधित कंपनीने टाकलेला भराव उचलणे, बस स्थानकावर प्रवासी निवारा बांधकाम करणे, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र शौचालय बांधकाम करणे, बसस्थानकावरील काही भागात डांबरीकरण करणे, शिक्षक कॉलनीतील रस्त्यावर टाकलेली माती उचलणे व त्या रस्त्याची दुरुस्ती करणे, काही ठिकाणी मुख्य रस्ता व नाली दुरुस्ती करणे इत्यादी कामे बाकी आहेत. ही सर्व कामे तत्काळ पूर्ण करावी, अशी मागणी देऊळगाव साकरशा येथील सरपंच संदीप आल्हाट, ग्रामपंचायत सदस्य बाळू वानखेडे यांनी महाराष्ट्र राज्य राज्य रस्ते विकास महामंडळ मेहकर कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन केली आहे.