पत्नीची तक्रार, पतीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल

By सदानंद सिरसाट | Updated: November 28, 2023 18:00 IST2023-11-28T17:59:22+5:302023-11-28T18:00:11+5:30

तिच्या पतीला दारूचे व्यसन आहे.

complaint of wife case of torture filed against husband in khamgaon | पत्नीची तक्रार, पतीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल

पत्नीची तक्रार, पतीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल

सदानंद सिरसाट, खामगाव (बुलढाणा)  : नागपूर येथे सासर असलेल्या शेगावातील २३ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून तिचा पती व सासू-सासरे यांच्याविरुद्ध बलात्काराचा व हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडित विवाहितेने शेगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यामध्ये तिच्या पतीला दारूचे व्यसन आहे.

तसेच त्याचे बाहेर अनैतिक संबंध आहेत. त्यावरून आरोपी पती फिर्यादी पत्नीसोबत नेहमी वाद करत होता. तसेच इच्छा नसताना तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत असल्याचे म्हटले. या प्रकाराला विरोध केला असता मारहाण करून जिवाने मारून टाकण्याची धमकी दिल्याचे म्हटले. पीडितेच्या सासू-सासऱ्याने तिच्या वडिलांनी लग्नाचा अर्धा खर्च दिला नाही, हुंड्याचे बाकी राहिलेले १५ लाख रुपये वडिलांकडून आण, असे म्हणत मारहाण केल्याचे नमूद केले. त्यासाठी शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचे म्हटले. त्यावरून शेगाव शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ४९८ अ, ३७६, ३७७, ५०४, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. तपास ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात सपोनि इंगोले करीत आहेत.

Web Title: complaint of wife case of torture filed against husband in khamgaon