शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कीडनाशक, तणनाशक औषधांच्या मिश्रणाने पिकांना धोका ; कृषी शास्त्रज्ञाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 18:28 IST

कृषी विभागाचा सल्ला न घेता वेगवेगळ्या औषधांच्या घटकांचे मिश्रण करून फवारणी केल्यामुळे पिकांवर विपरीत परिणाम होत असल्याचा दावा कृषी शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. 

ठळक मुद्देपरत-परत फवारणी करण्याचे काम पडू नये, यासाठी वेगवेगळी औषधी शेतकरी एकाच पंपात टाकतात.कीडनाशक, तणनाशक, टॉनिक अशा वेगवेगळ्या प्रकारचे औषधांचे मिश्रन करून फवारणी केल्या जाते. शेतकºयांनी कुठलीही औषधी फवारणी करण्यापूर्वी कृषी विभागाच्या शिफारशीनुसारच ती फवारावी. 

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: सध्या पिकांमध्ये तणाचे प्रमाण वाढलेले असताना हे तण नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या तणनाशक औषधांची फवारणी करण्यात येत आहे. मात्र जिल्ह्यात आतापर्यंत काही ठिकाणी तणनाशक फवारणीमुळे सोयाबीन पीक जळाल्याचे प्रकार समोर आल्याने तणनाशक फवारणीची शेतकºयांमध्ये भिती निर्माण झाली आहे. परंतू कृषी विभागाचा सल्ला न घेता वेगवेगळ्या औषधांच्या घटकांचे मिश्रण करून फवारणी केल्यामुळे पिकांवर विपरीत परिणाम होत असल्याचा दावा कृषी शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यात ७ लाख ३८ हजार ५४१ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचे नियोजन असून त्यामध्ये सर्वाधिक क्षेत्र हे सोयाबीन पिकाखाली येते. सोयाबीनचे ४ लाख ६ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर नियोजन आहे. सध्या खरीप हंगामाची पेरणी ८० टक्क्यापर्यंत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने पेरणीची कामे आता अंतीम टप्प्यात आली आहे.  जून अखेर व जुलै महिन्याच्या सुरूवातीला झालेल्या पावसाने शेतातील पिके बहरली आहेत. संततधार पडलेल्या पावसामुळे पिकांच्यामध्ये तणाची वाढही जोमाने झालेली दिसून येते. पिकांमधील हे तण नष्ट करण्यासाठी शेतकरी तणनाशक औषधांची फवारणी करत आहेत. तर पिकांची वाढ अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी टॉनिक व किटकांच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या कीड नाशकांचा फवारा सध्या पिकांवर मारल्या जात आहे. परंतू या औषधांच्या फवारणीचा विपरीत परिणाम झाल्याचा प्रकार जिल्ह्यात समोर आला आहे.  मेहकर तालुक्यात कळपविहिर याठिकाणी १६ एकरातील सोयाबीन तर लोणार तालुक्यातील शारा शेतशिवारातील १५ एकर शेतातील सोयाबीन पीक तणनाशक फवारणीमुळे जळाल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे. या प्रकारानंतर तणनाशक फवारावे किंवा नाही, असा संभ्रम शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. कृषी विभागाने दोन्ही ठिकाणी पाहणी केली असून, पुढील अहवाल येण्यास दोन ते तीन दिवस लागणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.परत-परत फवारणी करण्याचे काम पडू नये, यासाठी वेगवेगळी औषधी शेतकरी एकाच पंपात टाकतात. एकाच पंपामध्ये कीडनाशक, तणनाशक, टॉनिक अशा वेगवेगळ्या प्रकारचे औषधांचे मिश्रन करून फवारणी केल्या जाते. त्यामुळे औषधांच्या मिश्रणांचा फवार पिकांसाठी धोकादाय असल्याचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. सी. पी. जायभाये यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.  दोन दिवसात कळणार ‘फॉल्ट’मेहकर तालुक्यातील कळपविहीर येथे १६ एकरातील सोयाबीन जळाल्यानंतर तेच औषध दुसºयाच्या शेतावर कृषी विभागाचे अधिकारी, कंपनीचे अधिकारी व शेतकºयांच्या उपस्थितीत फवारणी करून बघण्यात आले आहे. त्यामुळे त्या शेतात सुद्धा काही विपरीत परिणाम झाला तर औषध कारणीभूत असल्याचे समजण्यात येईल. दोन ते तीन दिवसात सोयाबीन जळण्या मागचे नमेके कारण स्पष्ट होईल. 

 एकाच पंपात वेगवेगळ्या औषधांची फवारणी एकाच वेळी होऊ शकते; म्हणून औषधांचे मिश्रण करून फवारणी केल्यास पिके जळण्याचे प्रकार घडू शकतात. कळपविहीर येथील शेतकºयांनी वापरलेले तेच औषध इतर ठिकाणच्या शेतकºयांनी सुद्धा फवारले आहे, मात्र त्याचा काही विपरीत परिणाम झाला नाही. त्यामुळे सोयाबीन जळण्याच्या या प्रकारामागे नेमके कारण लवकरच समोर येईल. शेतकºयांनी कुठलीही औषधी फवारणी करण्यापूर्वी कृषी विभागाच्या शिफारशीनुसारच ती फवारावी. - डॉ. सी. पी. जायभाये,कृषी शास्त्रज्ञ, बुलडाणा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी