मलकापुरात अवैध रेती साठ्यावर जिल्हाधिकारी यांच्या पथकाची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 17:06 IST2019-06-26T14:54:53+5:302019-06-26T17:06:16+5:30

म लकापुरात अवैध रेती साठ्यावर जिल्हाधिकारी यांच्या पथकाची धाड

Collector raid on illegal sand storage in Mallakpur | मलकापुरात अवैध रेती साठ्यावर जिल्हाधिकारी यांच्या पथकाची धाड

मलकापुरात अवैध रेती साठ्यावर जिल्हाधिकारी यांच्या पथकाची धाड

मलकापुर : तालुक्यातील नळगंगा व पूर्णा नदीपात्रातून रात्रदिवस जेसीबी च्या साह्याने वाळूचे उत्खनन करून चोरट्या मार्गाने मोठ्या प्रामाणात शहरातिल शासकीय व निमशासकीय जागेवर रेती माफीयांनी अवैध रित्या रेती साठा जमा केला असून शासनाला करोडो रूपयांचा चुना लावला आहे. तर आज रोजी जिल्हाधिकारी यांच्या पथकाने मलकापुर शहरातील या अवैध रेती साठ्यावर कार्यवाही करून सुमारे ८०० ब्रास रेती साठा जप्त केला आहे. शहरातिल काही भागात अवैध रेती साठा रेती माफीयांनी जमा केला असल्याची गुप्त माहिती जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांना मिळाल्या वरून त्यांच्या आदेशांवये जिल्हा खणीकरण अधिकारी मरबाटे, मंडळ अधिकारी पायघन , नायब तहसीलदार राजगुरू आदींच्या पथकाने मलकापुर भाग ३ कुंड रस्त्यावर धाड टाकून विविध ठिकाणी असलेल्या ६ गंज्या सुमारे ८०० ब्रास रेती साठा बाजारभावाने अंदाजे किमत २ कोटी ५६ लाख रुपयाचा रेतीचा साठा जप्त केला आहे. जिल्हाधिकारी यांनी केलेल्या या कारवाही मुळे रेती माफीयांची धाबे दणाणले आहे.

Web Title: Collector raid on illegal sand storage in Mallakpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.