शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरा पंचायत समिती कर्मचा-यांचे काम बंद

By admin | Updated: January 20, 2015 00:52 IST

पदाधिकारी व अधिका-यांविरोधातील खोटे गुन्हे मागे घ्यावे यासाठी शिक्षक व कर्मचा-यांचे आंदोलन.

नांदुरा (बुलडाणा): नांदुरा पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे, या मागणीकरिता पं.स. अंतर्गत येणार्‍या शिक्षकांनी तथा सर्व विभागाच्या कर्मचार्‍यांनी १९ जानेवारी रोजी काम बंद आंदोलन केले. माहिती मागितली म्हणून मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या महासेन राजाराम सुरळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी काल पं.स. सभापती, उपसभापतीपती, गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व इतरांविरुद्ध विविध कलमान्वये दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी आज सदर आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्व कर्मचार्‍यांनी पं.स. आवारात बसून निषेध व्यक्त करण्याकरिता सभा सुरू केली असता या सभेला जि.प. सदस्य बलदेवराव चोपडे, वसंतराव भोजने, पं.स. सदस्य जयप्रसाद जाधव, गणेश भोपळे, प्रसाद जवरे, भारिप-बमसंचे राजरत्न तायडे, धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न पाचपोर, सुनील पाटील व अनेकांनी उपस्थिती दर्शवून आपला पाठिंबा व्यक्त केला. तर ठाणेदार साळुंके यांनी या सभेला भेट देऊन सदर प्रकरणात चौकशी होऊनच कार्यवाही होईल. त्यामुळे होणार्‍या चौकशीत सहकार्य करण्याचे आवाहन करीत कोणावरही अन्याय होणार नाही असे सांगितले. यावेळी तालुका आरोग्य संघटना, पं.स. कर्मचारी संघटना, जि.प.कर्म. महासंघ, तालुका ग्रामसेवक संघटना, जिल्हा ग्रामसेवक युनियन, म.रा. प्राथ. शिक्षक संघटनेच्या प्रमुखांनी ठाणेदार साळुंके यांना गुन्हे मागे घेण्याबाबत निवेदन दिले, अन्यथा काम बंद आंदोलन पुढेही सुरू राहील, असा इशारा दिला. या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी रुपाली दरेकर यांनी या प्रकरणातील १0५ मुख्याध्यापकांच्या चौकशीस पं.स.च्या कृषी विभागात प्रारंभ केला होता. वृत्त लिहीपर्यंत सदर चौकशी सुरू होती.